जिल्हा परिषदेसमोर आशा गटप्रवर्तकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:47 PM2017-09-26T23:47:54+5:302017-09-26T23:48:06+5:30

अंगणवाडी कर्मचाºयांचा मागील १५ दिवस चाललेला राज्यव्यापी संप फ ोडण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री यांनी अंगणवाडीची कामे आशा कर्मचाºयांचा देण्याचा निर्णय घेतला होता.

 Exhibitions of Asha GroupProjecters before the Zilla Parishad | जिल्हा परिषदेसमोर आशा गटप्रवर्तकांची निदर्शने

जिल्हा परिषदेसमोर आशा गटप्रवर्तकांची निदर्शने

Next
ठळक मुद्दे जीआरची होळी : अंगणवाडीच्या कामाला आशा कर्मचाºयांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अंगणवाडी कर्मचाºयांचा मागील १५ दिवस चाललेला राज्यव्यापी संप फ ोडण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री यांनी अंगणवाडीची कामे आशा कर्मचाºयांचा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आशा व गटप्रवर्तकांच्या संघटनांनीही अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाला पाठिंबा देत त्यांची कामे करण्यास सपशेल नकार दिला आहे. त्याच अनुषंगाने मंगळवारी चंद्रपूर येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने जिल्ह्याभरातील आशा गटप्रवर्तक कर्मचाºयांनी शासनाच्या जी.आर. ची होळी करून तीव्र निदर्शने केली.
यावेळी आशा गटप्रवर्तक कर्मचाºयांनी अंगणवाडी संपास पाठिंबा जाहीर करुन अंगणवाडीच्या कामास आशा कर्मचारी जाणार नाही असा निर्णय घेतला. या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, यांच्यामार्फ तीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना देण्यात आले.
आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी आरोग्य खात्याअंतर्गत येतात. ते सर्व कामे तुटपुंज्या मोबदल्यात करतात. आतापर्यंत सरकारने त्यांच्याही मागण्यांकडे दुर्लक्ष करून मानधन लागू केले नाही. व मिळणारा मोबदलासुध्दा मागील एप्रिल महिन्यांपासून थकीत आहे. पगारवाढ केल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका घेत अंगणवाडी कर्मचाºयांनी निदर्शने केली व आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
या शिष्टमंडळात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. विनोद झोडगे, भाकपाचे जिल्हा सचिव प्रा. नामदेवराव कन्नाके, आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष दास, प्रकाश रेड्डी, राजू गैनवार, श्रीधर वाढई, रविंद्र उमाटे, ममता भिमटे, निता पुट्टावार, कविता सुंदरकर, रजनी सोयाम, मिना आत्रात, सुनंदा मेश्राम, प्रिती चौधरी, ज्योती गोहणे, रेखा बोरकुटे, प्रतिमा नैताम उपस्थित होते.

Web Title:  Exhibitions of Asha GroupProjecters before the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.