वृध्द वडिलांचा सत्कार करून व्यक्त केली कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:35 AM2021-09-16T04:35:08+5:302021-09-16T04:35:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोवरी : तालुक्यातील निंबाळा येथील भोई समाजातील प्रतिष्ठित नागरिक धोंडुजी गोविंदा मोटघरे यांनी वयाच्या १०५ व्या ...

Expressed gratitude by honoring the elderly father | वृध्द वडिलांचा सत्कार करून व्यक्त केली कृतज्ञता

वृध्द वडिलांचा सत्कार करून व्यक्त केली कृतज्ञता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

गोवरी : तालुक्यातील निंबाळा येथील भोई समाजातील प्रतिष्ठित नागरिक धोंडुजी गोविंदा मोटघरे यांनी वयाच्या १०५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांच्या चारही मुलांनी सत्कार समारंभाचे आयोजन करत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सांगितले की, परमेश्वराचे रूप हे आपल्या घरातच असून, खऱ्या अर्थाने आई-वडिलांची सेवा केल्यास परमेश्वराची सेवा केल्यासारखे असते. आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार विभक्त कुटुंब पद्धतीत जीवन जगण्याकडे आजच्या पिढीचा कल वाढला असून, अशा परिस्थितीत मोटघरे भावंडं आपल्या आई-वडिलांची सेवा करत असल्याने मोठा आनंद होत असल्याचे सांगितले. यावेळी निमकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गावकऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गुलाब महाराज राठोड, ग्रामपंचायत सदस्य दीपक झाडे, साखरी येथील काशीनाथ गोरे, चिंचोली येथील माजी सरपंच अर्जुन पायपरे, गोवरी येथील लहू बोरकुटे, पोलीस पाटील पाल, माजी पोलीस पाटील सुरेश उरकुडे, महादेव मेश्राम, विठ्ठल पाल, जनार्धन मोटघरे, साईनाथ शेरकी, मधुकर मोटघरे, भिवसन मोटघरे, रामचंद्र मोटघरे उपस्थित होते.

 

150921/img-20210915-wa0035.jpg

 

आई वडील म्हणजेच परमेश्वराचे रूप

Web Title: Expressed gratitude by honoring the elderly father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.