पॅनकार्डसह आधार लिंक करण्याची मुदत वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:57 AM2020-12-11T04:57:00+5:302020-12-11T04:57:00+5:30

चंद्रपूर : कॅशलेस व्यवहार तसेच एका क्लिकवर नागरिकांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती मिळावी, या हेतूने प्रत्येक नागरिकाला बँक खात्याशी पॅनकार्ड ...

Extend the deadline for linking Aadhaar with PAN card | पॅनकार्डसह आधार लिंक करण्याची मुदत वाढवावी

पॅनकार्डसह आधार लिंक करण्याची मुदत वाढवावी

googlenewsNext

चंद्रपूर : कॅशलेस व्यवहार तसेच एका क्लिकवर नागरिकांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती मिळावी, या हेतूने प्रत्येक नागरिकाला बँक खात्याशी पॅनकार्ड व आधार लिंक करणे अत्यावश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२० अंतिम मुदत आहे. कोरोनाच्या दहशतीत या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करणे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कालावधीला मुदतवाढ देण्याची मागणी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.

बँक खात्याशी पॅनकार्ड व आधार लिंक करण्याचे आदेश आहेत. यासाठी ३१ डिसेंबर २०१९ ही अंतिम मुदत देण्यात आली. परंतु, अनेक नागरिकांना याबाबत अजुनही माहिती नाही. शिवाय जे पॅनकार्ड व आधार बँक खात्याशी जोडण्यासाठी जात आहेत त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कुणाच्या आधारकार्डवर जन्म तारीख नाही, तर आणखी काही त्रुट्यांना घोळ कायम असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. काहींनी शासकीय गॅझेटमध्ये त्रुट्यांची दुरूस्ती केल्यानंतर मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. परंतु सूचविलेल्या बदलांची नोंद घेतली नाही. काही ठिकाणी एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या बँकेत बचत खाते आहेत. ग्रामीण भागात लिंक कण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने होत आहे. त्यामुळे पॅनकार्ड व आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Extend the deadline for linking Aadhaar with PAN card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.