कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:43 PM2018-12-17T22:43:39+5:302018-12-17T22:44:00+5:30

केंद्रातील आणि राज्यातील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आली असून, प्रगतीपथावर आहेत.

Extend the welfare schemes to the masses | कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा

कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विचारमंथन बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्रातील आणि राज्यातील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारने अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आली असून, प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. सरकारचे लोककल्याणकारी निर्णय, कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावे, तसेच भाजपाचे संघटन अधिक बळकट करावे, असे आवाहन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपुरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात भाजपा पक्षाची जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. संजय धोटे, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, नगरसेवक राहुल पावडे, हिरामण खोब्रागडे, रामपाल सिंह, अनील फुलझेले, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अर्थमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांसाठी, ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आपण उपलब्ध केला आहे. स्वच्छता मोहिमेत जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.
जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्तम करण्याच्या दृष्टीने आपण योजना आखली आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्या आयएसओ करण्याचे काम सुरू आहे. ही सर्व विकास प्रक्रिया जनतेपर्यंत पोहोचवत जनता तसेच भाजपा यातील सुसंवाद अधिक प्रशस्त करावा. कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पाटीर्ची प्रतिमा जनमानसात अधिक ओजस्वी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. .
यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, तीन राज्यात भाजपा सत्तेत येऊ शकली नाही. काही जागा कमी मिळाल्या असल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणारी लोकसभेची निवडणूक जिंकत भारतीय जनता पार्टी पुन्हा आपले वर्चस्व सिध्द करेल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी अनेकांनी मार्गदर्शन केले. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस आशिष देवतळे यांनी सी.एम. चषक स्पर्धेचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय गजपूरे यांनी केले.
यावेळी भद्रावती तसेच ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीत निर्वाचित झालेल्या भाजपा सदस्यांचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Extend the welfare schemes to the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.