जिल्ह्यातील ११४ आरोग्य कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 06:00 AM2019-10-30T06:00:00+5:302019-10-30T06:00:12+5:30

वरोरा येथे उपजिल्हा रूग्णालय मंजूर झाल्यापासून अजुनही स्थायी कर्मचारी पदभरतमी भरण्यात आली नाही. अस्थायी कर्मचाऱ्यांचीच संख्या या ठिकाणी अधिक आहे. सद्यस्थितीत ३५ अस्थायी कर्मचारी कार्यरत असले तरी त्यांची सेवा करारानुसार संपली होती. त्यामुळे मुदतवाढ मिळणार की नाही, या प्रश्नांने कर्मचारी चिंताग्रस्त होते. चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयातही हाच प्रकार सुरू आहे.

Extension of 3 health workers in the district | जिल्ह्यातील ११४ आरोग्य कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

जिल्ह्यातील ११४ आरोग्य कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

Next
ठळक मुद्देरूग्णसेवेचा दर्जा सुधारणार : सीएसच्या अहवालावर शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आरोग्य विभागात कार्यरत असणाºया ११४ अस्थायी कर्मचाऱ्यांची सेवा मागील महिन्यातच समाप्त झाली होती. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली. ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाºया या कर्मचाºयांना अस्थिरतेची टांगती तलवार असल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्येही नाराजी होती. दरम्यान, जिल्हाशल्य चिकित्सकांच्या अहवालावर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे सर्वच १२४ कर्मचाऱ्यांना २९ फेबु्रवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात दररोज शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात. भद्रावती व वरोरा तालुक्यात प्रामुख्याने शेतीवर आधारीत उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांऐवजी शासकीय उपजिल्हा रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार करण्याशिवाय पर्याय नाही. वरोरा येथे उपजिल्हा रूग्णालय मंजूर झाल्यापासून अजुनही स्थायी कर्मचारी पदभरतमी भरण्यात आली नाही. अस्थायी कर्मचाऱ्यांचीच संख्या या ठिकाणी अधिक आहे. सद्यस्थितीत ३५ अस्थायी कर्मचारी कार्यरत असले तरी त्यांची सेवा करारानुसार संपली होती. त्यामुळे मुदतवाढ मिळणार की नाही, या प्रश्नांने कर्मचारी चिंताग्रस्त होते. चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयातही हाच प्रकार सुरू आहे. या रूग्णालयात तब्बल ७० अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून प्रशासकीय अधिकारी, परिसेविका, अधिकपरिचारिका, भौतिक उपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्ष किरण, प्रयोगशाळा, इसीजी, भांडार तथा वस्त्रपाल, कक्षसेवक व सफाई कामगार आदी कर्मचाºयांचा समावेश आहे. या अस्थायी कर्मचाºयांचीही मुदत संपली होती. विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच अस्थाई कर्मचाºयांबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी कर्मचारी संघटनांमध्ये चर्चा होती. मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्ह्यातील अस्थायी कर्मचाºयांच्या सेवेबाबत राज्य आरोग्य सेवा संचालनाकडे वस्तुनिष्ठ व सकारात्मक अहवाल सादर केला होता.
त्यामुळे हा अहवाल मान्य करून सर्व ११४ अस्थायी कर्मचाऱ्यांना २९ फेबु्रवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या निर्णयाचे सकारात्मक परिणाम जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विशेष वाघ्र संरक्षण पथकालाही दिलासा
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलात (एसटीपीएफ) दलात दीडशेहून अधिक वनकर्मचारी अस्थायी पदावर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची मुदत मागील महिन्यातच संपली. या कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक व वन निरीक्षक आदींचा समावेश आहे. वनविभागाने या सर्व कर्मचाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

रिक्त पदे भरावी
जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात रिक्त पदे भरण्यात आली. त्यामुळे रूग्णांना चांगली सुविधा मिळत आहे. परंतु, ग्रामीण तसेच आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, आस्थापन व परिचारिकांची पदे रिक्त आहेत. जिल्हा प्रशासनाने यावर कार्यवाही करावी.

Web Title: Extension of 3 health workers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर