विस्तार अधिकाऱ्यांना डावलून कनिष्ठांकडे पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:19 AM2021-07-08T04:19:25+5:302021-07-08T04:19:25+5:30
काही महिन्यांपूर्वी नागभीडच्या शालेय पोषण अधीक्षकाला दोन तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारीपदाचा प्रभार देण्यात आला होता. त्याच अधिका-याकडे तीन तालुक्यांच्या शालेय पोषण ...
काही महिन्यांपूर्वी नागभीडच्या शालेय पोषण अधीक्षकाला दोन तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारीपदाचा प्रभार देण्यात आला होता. त्याच अधिका-याकडे तीन तालुक्यांच्या शालेय पोषण अधीक्षकाची जबाबदारीही होती. त्या तालुक्यांमध्ये इतर अधिकारी असताना एकाच कनिष्ठ अधिकाऱ्यावर शिक्षणाधिकाऱ्यांकडून जबाबदारी टाकण्याची काय गरज, असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळात विचारला जात आहे. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांच्या मर्जीतील या अधिका-यांवर दोनदा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ऐनवेळी सर्व प्रभार काढून नागभीडमध्ये त्यांच्याकडे असलेली जबाबदारी सद्य:स्थितीत पार पाडत आहे. चंद्रपूर पं.स. गटशिक्षणाधिकारीपदाचा प्रभार भसारकर यांच्याकडे आहे. ही जबाबदारी सांभाळत असताना पोंभूर्णा येथून विस्तार अधिकारी मडावी यांची गतवर्षी चंद्रपुरात बदली झाली होती. परंतु, मडावी हे चंद्रपुरात मार्च महिन्यानंतर रुजू झाले. चार महिन्यांचा कालावधी लोटूनही सेवाज्येष्ठता असताना मडावी यांच्याकडे गटशिक्षणाधिकारीपदाचा प्रभार देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. मंगळवारी शिक्षण समितीच्या सभेतही या विषयावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर शिक्षणाधिका-यांनी पदाधिका-यांचीच दिशाभूल केली. त्यामुळे भसारकरांवर शिक्षणाधिका-यांचे प्रेम का उफाळून येत आहे, हे न उलगडणारे कोडे आहे.