केंद्र सरकारमुळे सर्वसामान्यांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:28 AM2021-03-27T04:28:52+5:302021-03-27T04:28:52+5:30

राजुरा : केंद्रातील शेतकरीविरोधी काळ्या कृषी कायद्यांमुळे देशभरातील शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होणार आहे. आपल्या निवडक व्यापारी मित्रांना ...

Extortion of the common man by the central government | केंद्र सरकारमुळे सर्वसामान्यांची पिळवणूक

केंद्र सरकारमुळे सर्वसामान्यांची पिळवणूक

Next

राजुरा : केंद्रातील शेतकरीविरोधी काळ्या कृषी कायद्यांमुळे देशभरातील शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होणार आहे. आपल्या निवडक व्यापारी मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी हे सरकार शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळत आहे. या काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहे. आतापर्यंत ३००पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. केंद्र सरकारने एकामागून एक सरकारी संस्थांचे खासगीकरण करीत आहेत. कामगार कायद्यांतील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत, या सरकारला सर्व सामान्य माणसाच्या जीवनमरणाचे काहीही देणे-घेणे नाही. कोरोनासारख्या महामारीच्या तडाख्यात आर्थिक खाईत सापडलेल्या नागरिकांना इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रचंड वाढ करून त्यांचे कंबरडे मोडले असल्याचे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

राजुरा येथे तहसील कार्यालयाजवळ उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, ज्येष्ठ नेते दादा पाटील लांडे, अशोकराव देशपांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, राजुरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रंजन लांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर, उपसभापती मंगेश गुरुनुले, पंचायत समिती सदस्य तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, कुंदा जेणेकर, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, न.प. सभापती हरजीत सिंग संधू, नगरसेवक गजानन भटारकर, दीपा करमनकर, संध्या चांदेकर, गीता रोहने, साधना भाके, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कार्याध्यक्ष नंदकिशोर वाढई, मोहसीन अली बंदाली, धोत्रा, युवक शहर अध्यक्ष अशोक राव, सर्वानंद वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, युवक तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, शहराध्यक्ष रफिक शेख, रामभाऊ ढुमणे, ॲड. रामभाऊ देवईकर विविध कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Web Title: Extortion of the common man by the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.