अल्पसंख्यकांसाठी जादा निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:01 PM2018-04-03T23:01:01+5:302018-04-03T23:01:01+5:30
राष्ट्रीय अल्पसंख्याक समुदायाला विकासाच्या प्रवाहात अणण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी जादा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. स्थानिक स्थानिक जैन भवनात पार पडलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रीय अल्पसंख्याक समुदायाला विकासाच्या प्रवाहात अणण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी जादा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. स्थानिक स्थानिक जैन भवनात पार पडलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार नाना शामकुळे, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष जमाल सिध्दीकी, प्रदेश सचिव ऐजाज देशमुख, विजय राऊत, महापौर अंजली घोटेकर, खुशाल बोंडे, राहुल सराफ, वरोराचे नगराध्यक्ष अहतेशाम अली, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा स्थायी समिती सभापती राहूल पावडे, भाजपा गटनेते वसंत देशमुख, बल्लारपूर येथील जामा मस्जिदचे अध्यक्ष अलहाज शेख उस्मान, मौलाना हाफीज मुख्तार खान, शेख इनायत, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेख जुम्मन रिझवी, अल्पसंख्यांक मोचार्चे महानगर अध्यक्ष आमीन शेख,सैय्यद सज्जाद अली, सोएब अली, जैन समाज प्रमुख महेंद्र मंडलेचा, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भाजपा अनुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे, अफजल, सोहेल अन्सारी आदी उपस्थित होते.
ना. अहीर म्हणाले, केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या. या योजनांमुळे अल्पसंख्याक समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. त्यामुळे संघटनानी समुदायात जागृती केली पाहिजे. शेख जुम्मन रिझवी यांनी अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. संचालन नासिर खान, जहिर खान कादरी यांनी केले. आमीन शेख यांनी आभार मानले. यावेळी जहिर खान कादरी, गौस खान पठाण, शब्बीर अलीयार अहमद, शेख हुसैन, हाजी शेख फरीद, डॉ. शेख मुबारक, फिरोज खान, शायरा शेख, रूखसाना शेख, सुरेश गोलेवार आदी उपस्थित होते.
अल्पसंख्यक समुदायासाठी चार हजार कोटींची तरतूद
केंद्र सरकारच्या वतीने देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी चार हजार कोटी रूपयांची तरतूद करण्याचे आश्वासन देण्यात आले. अल्पसंख्याक महिलांच्या शैक्षणिक सुविधांसाठी देशात पहिल्यांदाच दोन हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्री-मॅट्रीक, पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती, व्यावसायिक व तंत्र शिक्षणाकरिता ५२२ कोटी रुपयांच्या तरतुदीसोबतच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद नॅशनल फेलोशीप देण्यात येणार आहे. मोफत व्यावसायिक प्रशिक्षण आणि शैक्षणिक कर्जाकरिता १५३ कोटींची तरतूद केली असून या समुदायाने मुख्य प्रवाहात येऊन विकास साध्य करण्याची गरज आहे, असेही केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी यावेळी सांगितले.