विहिरगाव व मूर्ती शिवारालगतच्या नाल्यातून रेतीचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:28 AM2021-05-12T04:28:37+5:302021-05-12T04:28:37+5:30
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी रेतीच्या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने मूर्ती मार्गावर विहिरगावच्या एका मुलाला चिरडले होते. हे प्रकरण ताजे ...
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी रेतीच्या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने मूर्ती मार्गावर विहिरगावच्या एका मुलाला चिरडले होते. हे प्रकरण ताजे असताना परिसरातील ३ ते ४ तस्करांची मुजोरी कायम आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनतेवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहे. पण विहिरगाव व मूर्तीच्या रेती तस्करांनी लॉकडाऊनला न जुमानता रेती तस्करीचा गोरखधंदा सुरू केला आहे. या नाल्यातील रेती बारीक व दर्जेदार असल्याने प्रति टॅक्टर चार हजार दर मिळत आहे. आज घडीला विहिरगावात घरकूल व नाल्याचे बांधकाम सुरू असल्याने या कामावर रेतीचा वापर होत असल्याची चर्चा आहे. तस्करांचा हा गोरखधंदा मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. या अवैध वाहतुकीमुळे पांदण रस्त्याची पुरती वाट लागली आहे. कारवाई टाळण्यासाठी या तस्करांनी राजुरा, चनाखा, विहिरगाव या ठिकाणी आपली माणसे ठेवली आहे. महसूल विभागाने या तस्करांच्या मुसक्या आवळण्याची मागणी विहिरगावकारांनी केली आहे.