२५ वर्षे जुन्या पद्धतीनेच होतेयं नेत्र तपासणी

By admin | Published: July 23, 2015 12:45 AM2015-07-23T00:45:16+5:302015-07-23T00:45:16+5:30

विज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. संगणकाने सर्वच क्षेत्रात प्रवेश केला. परंतु, शासकीय रुग्णालयात आजही २५ वर्षापूर्वीच्या ...

Eye inspection with a 25-year-old method | २५ वर्षे जुन्या पद्धतीनेच होतेयं नेत्र तपासणी

२५ वर्षे जुन्या पद्धतीनेच होतेयं नेत्र तपासणी

Next

शासकीय रूग्णालयातील स्थिती : तपासणी चूक की अचूक यावर तपासणाऱ्याचीच शंका
प्रवीण खिरटकर  वरोरा
विज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. संगणकाने सर्वच क्षेत्रात प्रवेश केला. परंतु, शासकीय रुग्णालयात आजही २५ वर्षापूर्वीच्या पद्धतीने नेत्र तपासणी करून चष्म्याचे नंबर दिले जात असल्याने रुग्णांनी याकडे पाठ फिरवून खासगी रूग्णालयाची वाट धरल्याचे चित्र आहे. शासनाने या पद्धतीमध्ये बदल केला नाही तर नेत्र विभाग गुडांळण्याचा प्रसंग ओढावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शासकीय रुग्णालयात नाममात्र पाच रुपये घेऊन रुग्णांची तपासणी करून मोफत औषधी व इंजेक्शन दिले जाते. यासोबतच पाच रुपयाच्या पावतीवर नेत्र तपासणी करून डोळ्याचा आजार व चष्म्याचे क्रमांक दिले जाते. नेत्र तपासणीची सेवा शासकीय रुग्णालयातील शहरी व काही ग्रामीण भागातील रूग्णालयामध्ये उपलब्ध असल्याने सर्व सामान्य नागरिक या सेवेचा लाभ घेत असतात. बीपीएल धारकास व शालेय विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात नेत्रतपासणी केली असता, त्यांना मोफत चष्मा पुरविण्यात येते. मात्र शासकीय रुग्णालयातील बहुतांश ग्रामीण भागामध्ये २५ वर्षापूर्वी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीनेच नेत्र तपासणी आजही सुरू आहे.
तंज्ञ व्यक्तीकडून ट्रायल बॉक्स, व्हिजन ड्रम या पद्धतीचा वापर करून नेत्र तपासणी केली जात आहे. या जुन्या पद्धतीने नेत्र तपासणी होत असल्याने नेत्र तपासणीला वेळ लागतो व नेत्र तपासणीही अचुक आहे किंवा नाही याबाबत नेत्र तपासणारेच शंका उपस्थित करीत असल्याचे दिसून येत आहे.
व्हिजन ड्रमवरील अक्षरे ओळखून त्यानुसार चष्मा दिला जातो. व्हिजन ड्रमवरील अक्षरे वाचणाऱ्यांसाठी ही पद्धत तुर्तास बरी असली तरी ज्या वृद्धांना अक्षरे वाचता येत नाही, अश्यांकरिता मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या तपासणीकडे अनेकांनी पाठ फिरवून खाजगी सेवा घेत आहेत.

अनेक ठिकाणच्या अ‍ॅटोरेप मशीन बंद
शासनाच्या २५ वर्षापासून सुरू असलेल्या नेत्र तपासणीकरिता काही शासकीय रुग्णालयात संगणकाने नेत्र तपासणी व्हावी याकरिता अ‍ॅटोरेप मशीनचा पुरवठा करण्यात आला. त्यातील मशीन कित्येक महिन्यापासून बंद पडल्या आहे. त्या दुरुस्त करण्यात आल्या नाही. त्यामुळे ज्या रुग्णालयात अ‍ॅटोरेप मशीन बंद आहे, तिथे पूर्वीप्रमाणे नेत्र तपासणी करणे सुरू असल्याची माहिती आहे.

Web Title: Eye inspection with a 25-year-old method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.