लढाऊ वृत्तीने आपल्यासमोरील आव्हानांचा सामना करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:11 PM2017-08-23T23:11:32+5:302017-08-23T23:11:53+5:30
दिवसेंदिवस समाज बांधवापुढे अनेक आव्हाने येत आहेत. या आव्हानाला न डगमगता लढाऊ वृत्तीने समाजासमोरील आव्हानांचा मुकाबला करावा,
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिवसेंदिवस समाज बांधवापुढे अनेक आव्हाने येत आहेत. या आव्हानाला न डगमगता लढाऊ वृत्तीने समाजासमोरील आव्हानांचा मुकाबला करावा, असे प्रतिपादन आदिवासी संशोधक डॉ. सुशील कोहाड यांनी केले.
राष्ट्रीय आदिम कृती समिती, चंद्रपूरच्यावतीने रविवारी महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक आदिवासी धोरणाच्या निषेर्धात रक्त स्वाक्षरी व रक्तदान कार्यक्रम शिवाजी चौक, चंद्रपूर येथे पार पडला. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून आदिवासी हलबा समाज बांधवांनी उत्स्फुर्तपणे वॉर्डावॉर्डातून रॅली काढून शिवाजी चौक चंद्रपूर या कार्यक्रमस्थळी एकत्र येऊन कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक आॅफ इंडियाचे माजी सहायक महाव्यवस्थापक बाळकृष्ण सोरते, तर प्रमुख पाहुणे म्हणुन अॅड. नंदा पराते, योगेश गोन्नाडे, संजय हेडाऊ, गजाननराव सोरते, (वर्धा) उदय धकाते (गडचिरोली), प्रा. डॉ. विजय सोरते, (बल्लारपूर) उपस्थित होते.
यावेळी कोहाड पुढे म्हणाले, सुप्रिम कोर्टाच्या ६ जुलै २०१७ च्या निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी सर्व समाज बांधवांनी एकजुटीने न्यायालयीन तसेच रस्त्यावरची लढाई करण्यावर भर दिला. तसेच हलबा समाजाच्या गौरवशाली भुतकाळाबद्दल माहिती दिली. तर योगेश गोन्नाडे मार्गदर्शन करताना म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या २००१ च्या जाती कायद्यातील तरतुदींचे विवेचन करून जात कायदा कसा घटनाबाह्य आहे. याबाबत दाखले देऊन समाजावून सांगितले. तसेच समाज बांधवांनी न घाबरता एक जुटीने लढणयाचे आव्हान केले. स्थानिक जेष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ पेकडे, विकास निपाणे, अभिजीत दलाल आणि ललिता बेहरम, कुंभारे आरमोरी यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी पार पडलेलया रक्तस्वाक्षरी अभियानात दोन हजारांवर हलबा आदिवासींनी स्वत:च्या नावे स्वाक्षरी करून रक्ताचे ठसे उमटविले. तर यावेळी ६१ आदिवासींनी रक्तदान केले.
संचालन प्रा. ईशान नंदनवार, विलास निपाने, प्रास्ताविक पुुंडलिक नंदुरकर यांनी तर आभार सरिता सोनकुसरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर धकाते, पूंडलिक नंदूरकर, राजू नंदनवार, मधुकर कुंभारे, रेखा बल्लारपुरे, आदिम युवा सेना, आदिम कर्मचारी सेनेचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.