गोलबाजारात सुविधा उपलब्ध करून द्याव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:31 AM2021-02-09T04:31:26+5:302021-02-09T04:31:26+5:30
चंद्रपूर : येथील गोलबाजारमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने व्यावसायिकासह नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. विशेषत: बाजारातील रस्ते अगदीच ...
चंद्रपूर : येथील गोलबाजारमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने व्यावसायिकासह नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे. विशेषत: बाजारातील रस्ते अगदीच निमुळते असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यातच काही नागरिक बाजारात वाहने नेत असल्यामुळे अपघाताची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेला गोलबाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या बाजारात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची संख्या बरीच आहे. किराणा ते भाजीपाल्यापर्यंतच्या सर्वच वस्तू या बाजारात विकत घेता येते़. कापड दुकानांची संख्या वाढल्याने ग्राहकांची दरदिवशी मोठी गर्दी होत आहे.
सर्व वस्तू एकच ठिकाणी मिळणाऱ्या गोल बाजारात मूलभूत सुविधा नाही. सध्या येथील व्यावसायिक सकाळ पासून तर रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करतात. याच बाजारात किरकोळ भाजी विक्रेतेही दुकाने लावतात़. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.