६,७३२ शेतकऱ्यांना पाच कोटी ८९ लाखांचा फ टका
By Admin | Published: July 3, 2017 12:52 AM2017-07-03T00:52:39+5:302017-07-03T00:52:39+5:30
यावर्षी तुरीचे चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी उत्पादन झाले. मात्र बाजार भाव घसरले. त्यातच शासनाने हमी भावाने तूर खरेदी केंद्र उशिराने सुरू केले.
दर कोसळले : मिळेल त्या भावात तुरीची विक्री
प्रविण खिरटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : यावर्षी तुरीचे चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी उत्पादन झाले. मात्र बाजार भाव घसरले. त्यातच शासनाने हमी भावाने तूर खरेदी केंद्र उशिराने सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात तुरी विकल्या. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सहा हजार ७३२ शेतकऱ्यांना पाच कोटी ८९ लाख रुपयांचा फटका बसला आहे.
मागील काही वर्षापासून अल्वावधित होणाऱ्या व कमी खर्च असलेल्या सोयाबीन पिकाची शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करीत होते. परंतु मागील वर्षी तुरीचे भाव सर्वाधिक असल्याने मागील हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे पाठ दाखवित तूर पीक घेतले.
तुरीचे उत्पादनही चांगले झाले. शासनाने तुरीचा पाच हजार ५० रूपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला. तुरी निघताच बाजारातील भाव पडले. जास्त दिवस तूर घरात ठेवल्यास त्याची प्रतवारी खराब होईल, अशा संकटात तूर उत्पादक शेतकरी सापडला. शासनाने हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब केला. त्यामूळे व्यापाऱ्याकडे जिल्ह्यातील सहा हजार ७३२ शेतकऱ्यांनी ७३ हजार ७३५ क्ंिटल तुरी विकल्या.
शेतकऱ्यांना साधारणता चार हजार प्रति क्ंिवटल भाव खुल्या बाजारात मिळाला. शासनाचा पाच हजार ५० रूपये प्रति क्ंिवटल हमी भाव बघता शेतकऱ्यांना पाच कोटी ८९ लाख ४४ हजार ९०० रूपयांचा फ टका बसला आहे.