नाफेडच्या तूर खरेदीवर संपाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:35 AM2019-03-07T04:35:35+5:302019-03-07T04:35:40+5:30

राज्यात यंदा तुरीचे बऱ्यापैकी उत्पादन होऊनही बाजारभाव नाही. शासनाने नाफेड मार्फत हमी भावाने तूर खरेदीची प्रक्रिया सुरू केली.

Failure to buy Nafed Tire | नाफेडच्या तूर खरेदीवर संपाचे सावट

नाफेडच्या तूर खरेदीवर संपाचे सावट

Next

चंद्रपूर : राज्यात यंदा तुरीचे बऱ्यापैकी उत्पादन होऊनही बाजारभाव नाही. शासनाने नाफेड मार्फत हमी भावाने तूर खरेदीची प्रक्रिया सुरू केली. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने नाफेडच्या तूर खरेदीमध्ये खोडा निर्माण झाला आहे. शासनाने हंगामात तुरीला प्रति क्विटल पाच हजार ६७५ रुपये हमभाव जाहीर केला. नाफेडमार्फत तूर विक्री करता यावी, याकरिता शेतकऱ्यांनी हंगामाचे पेरीव पत्र, बँक पासबुक व आधारकार्ड देऊन नोंदणी केली. १ मार्च पासून तूर खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने जाहीर केला. त्याकरिता एजन्सी नियुक्ती करून त्यांच्यामार्फत शेतकºयांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच सबएजन्सी म्हणून काम पाहत असल्याने जागा व वजनकाटे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. खरेदीची संपूर्ण तयारी झाली. दरम्यान, राज्यातील सर्वच बाजार समितीमधील स्थायी, अस्थायी व हंगामी कर्मचाºयांनी आंदोलन पुकारल्याने नाफेडची तूर खरेदी लांबणीवर गेली आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
>बाजार समित्यांचे नुकसान
नाफेडच्या वतीने तूर खरेदीकरिता एजन्सीची नेमणूक झाली आहे. काही दिवसात खरेदी सुरू होणार असल्याचे शेतकºयांना सांगण्यात आले, पण संपामुळे अडचणी आल्या. खरेदीद्वारे बाजार समित्यांना शेष निधी मिळतो. मागील वर्षीचा शेष निधी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अद्याप मिळाला नाही. यामुळे या वर्षीच्या तूर खरेदीला सहकार्य कसे करावे, असा प्रश्न संचालक विचारत आहेत.

Web Title: Failure to buy Nafed Tire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.