वाहनावरील दंड न भरल्यास न्यायालयीन कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:28 AM2021-09-19T04:28:53+5:302021-09-19T04:28:53+5:30

मोटार वाहन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून कार्यवाही केली जाते. चालकांजवळ दंड भरण्यास पैसे नसल्यास १५ दिवसांपर्यंत भरण्याची सवलत ...

Failure to pay the fine on the vehicle | वाहनावरील दंड न भरल्यास न्यायालयीन कारवाई

वाहनावरील दंड न भरल्यास न्यायालयीन कारवाई

Next

मोटार वाहन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून कार्यवाही केली जाते. चालकांजवळ दंड भरण्यास पैसे नसल्यास १५ दिवसांपर्यंत भरण्याची सवलत दिली जाते. परंतु, बरेच वाहनचालक जाणीवपूर्वक दंडाची रक्कम भरण्याकडे काणाडोळा करतात. परंतु, अशांवर कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी वाहनधारकांना मोबाईलवर एसएमएसद्वारे नोटीससोबत लिंक जोडून तसेच ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात येत आहेत. थकीत दंड असलेल्यांनी २१ तारखेच्या आत ऑनलाईन किंवा जवळील पोलीस ठाण्यात दंडाची रक्कम भरली नाही, तर २५ सप्टेंबरच्या लोकअदालतीला सामोर जाण्याचे समन्स जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे थकीत दंड भरण्याचे आवाहन वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.

बॉक्स

ऑनलाईन दंड भरता येणार

वाहनचालकांना थकीत दंड ऑनलाईन किंवा जवळील पोलीस स्टेशनमध्ये भरता येऊ शकते. वाहनचालक महाट्राफिक ॲपवर आपल्या वाहनावर असलेले थकीत दंड बघू शकतात. तसेच ऑनलाईन पद्धतीने दंडही भरू शकतात. न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी २१ तारखेच्या आत दंड भरावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

----

कोट

ज्या वाहनांवर दंडाची रक्कम प्रलंबित आहे, त्यांनी २१ सप्टेंबरपूर्वी थकीत दंडाचा भरणा ऑनलाईन किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला भरणा करावा, अन्यथा न्यायालयीन कारवाईला सामोर जावे लागणार आहे.

- प्रवीणकुमार पाटील, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, चंद्रपूर

Web Title: Failure to pay the fine on the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.