पाणी डवा पाणी जिरवा योजनेचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:51 AM2021-02-18T04:51:38+5:302021-02-18T04:51:38+5:30
राजुरा : शासनाने पाण्याची पातळी वाढली पाहिजे व शेतकऱ्यांना ओलितास पाणी ...
राजुरा : शासनाने पाण्याची पातळी वाढली पाहिजे व शेतकऱ्यांना ओलितास पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना राबवून नाल्यावर बंधारे बांधून पाणी रोखण्यात आले. परंतु विहीरगाव येथील बंधाऱ्याची लोखंडी प्लेट कचऱ्यात सडत असल्यामुळे शासनाचा उद्देशच बुडाला आहे.
राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथील राईस मिलजवळील नाल्यावर पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेंतर्गत बंधारा बांधून बरीच वर्षे झाली. पाणी अडवून ठेवण्यासाठी लोखंडी प्लेट आणून ठेवल्या. परंतु त्या न लावता बाजूला झुडपात बेवारस अवस्थेत पडून आहेत. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षपणामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेला बंधारा शोभेचा ठरला आहे. पावसाचे पाणी अडवा व जिरवा मोहीम संपुष्टात आली आहे.