बोगस कामे दाखवून अफरातफरीचा आरोप

By admin | Published: October 26, 2016 01:22 AM2016-10-26T01:22:46+5:302016-10-26T01:22:46+5:30

सावली तालुक्यातील अंतरगाव (निफंद्रा) येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाने शासनाकडून आलेल्या मनरेगा व इतर निधीचा गैरवापर करून

False allegations by showing bogus tasks | बोगस कामे दाखवून अफरातफरीचा आरोप

बोगस कामे दाखवून अफरातफरीचा आरोप

Next

चौकशीचे आदेश : अधिक देयक अदा
चंद्रपूर : सावली तालुक्यातील अंतरगाव (निफंद्रा) येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाने शासनाकडून आलेल्या मनरेगा व इतर निधीचा गैरवापर करून लाखोची अफरातफर केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ग्रामसभेत चौकशीचे आदेश देऊन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी व गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आलीे.
अंतरगाव या गावाची लोकसंख्या ्अंदाजे सात ते आठ हजार आहे. शेतीवर जाण्यासाठी पांदण रस्ते आहे. या रस्त्यावरून ये-जा करण्याकरिता शेतकऱ्यांना त्रास होत होता. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेतून पांदण रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षात पांदण रस्त्याची अनेक कामे ग्रामपंचायत व कंत्राटदाराकडून करण्यात आली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेल्या कामाचा मोबदला मजुरांना कमी देण्यात आला. याबाबत ग्रामस्थानी सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. राईस मिल ते मायाबाई मस्के या पांदन रस्त्याचे काम सन २०१३-१४, व २०१४-१५ मध्ये करण्यात आले. मात्र या कामाचे बिल दोनदा अदा केल्याचे दाखविण्यात आले. याही कामाचा मोबदला मजुरांना पूर्णत: अदा करण्यात आलेला नाही.
सभेत हा सर्व गैरप्रकार उघडकीस आल्याने चौकशीचे आदेश देण्यात आले.
ग्रामसभा अशोक नंदनवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला विस्तार अधिकारी, सामाजिक अंकेक्षण संचालनालय, नागपूरच्या विभागीय अधिकारी चेतना लाटकर यांच्या उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)

ग्रामसभेत आढळला गैरव्यवहार
रुग्णालयाच्या अंतरगाव ते नदी घाट या पांदन रस्त्याचे काम न करता २ लाख ३६ हजार रुपये अदा केल्याचे दाखविण्यात आले. परंतु ते बिल रेकॉर्डला जोडण्यात आले नाही. रक्कमेतून कंत्राटदाराला ६ लाख रुपये जास्तीचे देण्यात आले ही तफावत अंकेक्षण अहवालामध्येही दाखविण्यात आली. परंतु त्याचीही नोंद कॅशबुकला नाही. माडू राऊत ते मुकुंदा लाकडे या पांदन रस्ता तयार करण्यात आला. या कामाचे ३ लाख ९८ हजार रुपये अदा करण्यात आले. परंतु ग्रामसेवकाने याची नोंद कॅशबुकला घेतली नाही. सदर कामाचे बिल नसताना ही रक्कम कंत्राटदारात देण्यात आली. याच पांदण रस्त्याला ४ लाख ४७ हजार रुपये बिल दाखवून पुन्हा अदा करण्यात आले. त्यानंतरही १ लाख ९१ हजार कंत्राटराला कमी दिल्याचे ग्रामसभेच्या सभेला दिसून आले.

Web Title: False allegations by showing bogus tasks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.