डेरा आंदोलनात मुस्लीम बांधवांनी केले फराळ वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:51 AM2021-03-13T04:51:03+5:302021-03-13T04:51:03+5:30
चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५००च्या जवळपास कोरोना योद्ध्ये कंत्राटी कामगारांना सात महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतन ...
चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५००च्या जवळपास कोरोना योद्ध्ये कंत्राटी कामगारांना सात महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतन देण्यात द्यावे या मागण्यांसाठी मागील ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या डेरा आंदोलनामध्ये चंद्रपूर जिल्हा व शहर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी महाशिवरात्रीनिमित्त फराळ वाटप करून एक आदर्श उपक्रम राबविला.
एमआयएमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अनेक मुस्लीम बांधवांना सोबत घेऊन डेरा आंदोलनाच्या मंडपात महाशिवरात्रीनिमित्त सर्व कामगारांना फराळ व केळांचे वाटप केले. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष नाहीद हुसैन, चंद्रपूर शहर अध्यक्ष अजहर शेख, युवा अध्यक्ष शाहिद शेख, समीर मिर्झा, साजिद शेख, अवेश कुरेशी, सोहेल शेख, असलम शेख, वसीम पॉशा, तौसिफ खान, फरहान शेख, इर्शाद शेख, रजत खोब्रागडे, सुहास भैरे, अल्फाज खान, सलीम शेख, पिंटू बागवान, जावेद कुरेशी, वसिम कुरेशी, साजिद कुरेशी या सर्व पदाधिकाऱ्यांनी फराळ वाटपाच्या कार्यक्रमात योगदान दिले. सामाजिक बंधुभाव जोपासणाऱ्या या उपक्रमाचे समाजातील सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
संभाजी ब्रिगेड व इको-प्रोचा पाठिंबा
संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष विनोद थेरे , केंद्रीय निरीक्षक चंद्रकांत वैद्य, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. सचिन बोधाणे, जिल्हा सचिव गजानन नागपुरे, महानगर अध्यक्ष ॲड. मनीष काळे, सचिव प्रशांत लांडे, अक्षय लोणारे, कवडूभाऊ काळे तसेच इको-प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे पदाधिकारी नितीन रामटेके, कुणाल देवगिरकर यांच्या शिष्टमंडळाने डेरा आंदोलनाला भेट देत जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना समर्थनाचे पत्र दिले.