राखी पौर्णिमेमुळे खासगी प्रवासी दरात भाडेवाढ; मुंबई, पुणेसाठी आता दीड हजार रुपये भाडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:17+5:302021-08-20T04:32:17+5:30
चंद्रपूर : तीन दिवसांवर राखी पौर्णिमा आली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली ...
चंद्रपूर : तीन दिवसांवर राखी पौर्णिमा आली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मुंबई किंवा पुणेच्या प्रवासासाठी दीड हजार रुपयांपर्यंतचे दर आकारण्यात येत आहे.
कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध होते. मात्र कोरोेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू आहे. त्यातच राखी पौर्णिमा दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली आहे. त्यातच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने खासगी प्रवासी वाहनांनी आपल्या दरात वाढ केली असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
कोरोनामुळे अनेक खासगी ट्रॅव्हल्स बंद होत्या. केवळ मोजक्याच ट्रॅव्हल्स धावत होत्या. परंतु, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सची संख्या वाढली आहे. पूर्वी मुंबई, पुणे, हैदराबाद आदी ठिकाणी जाण्यासाठी केवळ एक ते दोन ट्रॅव्हल्स धावत होत्या. मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे.
जिल्ह्याअंतर्गत धावणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्याही कोरोनामुळे कमी करण्यात आली होती. मात्र आता पूर्वीप्रमाणेच ट्रॅव्हल्स धावत आहे. प्रवाशांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत दुप्पट ट्रॅव्हल्स धावत आहेत.
कोट
मागील काही महिन्यांपासून डिझेलच्या दरामध्ये सततची वाढ होत आहे. त्यामुळे अल्प प्रमाणात भाडेवाढ झाली आहे. कोरोनामुळे पॅसेंजरही पूर्वीप्रमाणे प्रवास करीत नाही.
- ट्रॅव्हल्स व्यावसायिक
कोट
मागील दीड वर्ष व्यवसाय ठप्प होता. आता काही प्रमाणात सुरू झाला आहे. त्यातच सतत पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत आहे. परंतु, अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी प्रवास करीत नाहीत. डिझेल दरवाढीने अल्प वाढ केली आहे
- ट्रॅव्हल्स व्यावसायिक