वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:31 PM2018-02-21T23:31:13+5:302018-02-21T23:33:26+5:30

वेकोलिने कोळसा उत्खनन केल्यानंतर माती ढिगारे शेताजवळच टाकत असल्याने त्यावर झुडपी जंगल वाढल्याचे चित्र राजुरा तालुक्यातील विविध गावांत दिसून येत आहे.

Farm losses from wild animals | वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान

वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान

Next
ठळक मुद्देवेकोलिचे ढिगारे : सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमत
गोवरी : वेकोलिने कोळसा उत्खनन केल्यानंतर माती ढिगारे शेताजवळच टाकत असल्याने त्यावर झुडपी जंगल वाढल्याचे चित्र राजुरा तालुक्यातील विविध गावांत दिसून येत आहे. या जंगलात दबा धरून बसणाºया वन्यप्राण्यांकडून पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे सर्वेक्षण करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली, मानोली, बाबापूर, कढोली, गोयेगाव, अंतरगाव येथील बराचसा भाग वेकोलि परिसराला लागून आहे. कोळसा उत्खनन केल्यानंतर वेकोलि प्रशासनाकडून ही माती शेताजवळच टाकत आहे. त्यामुळे अनेक गावांच्या शेताजवळ टेकडी तयार झाली. सातरी, चनाखा, विहिरगाव, पंचाळा परिसराला जंगल अगदी लागून असल्याने या ठिकाणी नेहमी वन्यप्राण्यांचे कळप आढळतात. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी आधीच हतबल झाला आहे. बोंडअळीने शेती उद्ध्वस्त झाली. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन मोठी घट झाली आहे.
बोंड अळीने शेतकºयांचा कापूस पूर्णत: वाया गेला. दरम्यान, अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतमालाचे नुकसान झाले. रब्बी हंगामात भाजीपाला व अन्य पिके शेतात उभी असताना वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला. यातही शेतीचे नुकसान होत आहे. शेतकºयांना आयुष्यभर संघर्षच करावा लागत आहे. शेतकºयांच्या नशिबी संघर्षाचे जगणेच आले आहे. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करूनही शेतीची माती होत आहे सरकार शेतामालाला भाव देत नाही. निसर्ग शेतकºयांच्या साथ देत नाही. वन्यप्राणी शेतातील पीक उद्धवस्त करीत आहेत. वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी स्वत:चा जीव धोक्यात घालून मचाणीवरुन हुसकावण्याचा प्रयत्न करीत आहे.पिकांच्या रक्षणासाठी जागली सुरू आहे. मात्र, वेकोलिच्या ढिगाºयामुळे वन्यप्राण्यांना अगदी शेताजवळच आश्रय मिळाला. जंगलाचा परिसर दूर असूनही केवळ वेकोलिच्या मनमानी कारभारामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. वेकोलिने शेताजवळ माती टाकणे बंद करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

वन्य प्राण्यांकडून भरदिवसा उभे पीक उद्ध्वस्त केले जात आहे. शेताच्या जवळच वेकोलिने मातीचे ढिगारे तयार केले. त्यावर झुडपी जंगल तयार झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी रब्बी पिकांचे जंगली प्राण्यांकडून नुकसान सुरू असल्याने शेतात जागली करावी लागत आहे.
- तुषार चौथले, शेतकरी, पांचाळा

Web Title: Farm losses from wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.