आर्वी येथे सोयाबीन पिकाबाबत शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:29 AM2021-08-23T04:29:40+5:302021-08-23T04:29:40+5:30
सध्या वातावरण बदलामुळे सोयाबीन पिकावर उंट अळी, खोडमाशी, चक्रीभुंगा तसेच तंबाखूची पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो व त्यामुळे ...
सध्या वातावरण बदलामुळे सोयाबीन पिकावर उंट अळी, खोडमाशी, चक्रीभुंगा तसेच तंबाखूची पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो व त्यामुळे पिकांचे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे, असे मत धाबा मंडळाचे कृषी पर्यवेक्षक जी. बी. पाटील यांनी केले आहे.
तालुका कृषी विभागाच्या वतीने नुकतीच आर्वी येथे सोयाबीन पिकावरील शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. शेतकऱ्यांनी कीड व्यवस्थापनासाठी पक्षी थांबे लावावेत, जेणेकरून किडींचे नैसर्गिकरित्या नियंत्रण करता येईल, यासोबतच कामगंध सापळे, प्रकाश सापळे, पाच टक्क़े निंबोळी अर्काची फवारणी करावी, असेही त्यांनी सांगितले. या शेतीशाळेत गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.