धानाची उतारी घटल्याने शेतकरी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:53 PM2017-12-09T23:53:44+5:302017-12-09T23:53:57+5:30

नागभीड तालुका भात पिकाकरिता प्रसिद्ध आहे. यावर्षी परिसरात वरुणराजाने उशिरा का होईना, पण बºयापैकी हजेरी लावली. बळीराजाने रक्ताचे पाणी केल्याने शेतामध्ये धान पीक मोठ्या डौलाने उभे होते.

 Farmer Bazara due to the reduction of the strike | धानाची उतारी घटल्याने शेतकरी बेजार

धानाची उतारी घटल्याने शेतकरी बेजार

Next
ठळक मुद्दे शेतकरी चिंतेत : शासनाने भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मिंडाळा : नागभीड तालुका भात पिकाकरिता प्रसिद्ध आहे. यावर्षी परिसरात वरुणराजाने उशिरा का होईना, पण बºयापैकी हजेरी लावली. बळीराजाने रक्ताचे पाणी केल्याने शेतामध्ये धान पीक मोठ्या डौलाने उभे होते. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न हाती येईल, अशी आशा होती. परंतु बदलत्या हवामानाचा धान पिकावर परिणाम झाला. बेरड, मावा, तुडतुडा, करपा आणि कडा करपा अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला. परिणामी यंदा धानाच्या उतारीत मोठी घट आली आहे. त्यामुळे शेतकरी बेजार झाले आहेत.
परिसरातील शेतकºयांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी व गडचिरोली जिल्ह्यातील वडसा या दूरच्या शहरातील कृषी केंद्रामधून औषधी खरेदी करून पिकावर फवारणी केली. परंतु, धान पिकावरील रोग आटोक्यात येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. बळीराजाने शेवटच्या क्षणापर्यंत पिकावर औषधांची फवारणी केली. पण पिकात काहीच सुधारणा झाली नाही.
परिसरातील तुकूम तिव्हर्ला या शिवारातील शेतकरी वसंत बळीराम चिलबुले यांची गट नं. ३०१ मध्ये ४४ हे.आर. शेत जमीन आहे. त्यांनी रोवणी केली. जेव्हा पीक कापणीला आले तेव्हा धानाचे लोंब अपूर्ण अवस्थेत भरलेले दिसले. नमुना म्हणून एका बांधीतील धानाची कापणी व मळणी करून पाहिली. तेव्हा उतारी फार कमी आली.
या शेतकºयाने धान पिकाकरिता जवळपास दीड लाख रुपये खर्च केले. मात्र उत्पादन फार कमी झाल्यामुळे सावकार व बँकेचे पीक कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते सापडले आहेत. असाच प्रकार अनेक शेतकºयांसोबत घडला असून धानाची मळणी केल्यानंतर त्यांना सुद्धा एकरी तीन ते चार पोते उत्पादन हाती आले आहे.

बजेट कोलमडले
गेवरा (बु) : धानाच्या मळणीला सुरुवात झाली आहे. मात्र यावर्षी विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे भरघोष उत्पन्नाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. एकरी धानाची उतारी सहा ते सात पोते उत्पन्न होत असल्याने शेतकºयांचे संपूर्ण बजेट बिघडल्याने नैराश्य दिसून येत आहे. उशिराच्या पावसाने का होईना, धान जोमात वाढून आले. परंतु मावा, तुडतुडा, कीड यासारख्या अनियंत्रीत रोगांनी धान पीक उद्धवस्त करून टाकले. मळणीच्या शेवटी पोत्यांची नव्हे तर एकरी बोली लावण्याची वेळ आली आहे. शेतकºयांच्या शेतात एकरी बांधण्यात आलेले भारे धानाच्या गंजीत जास्त दिसत असले तरी उतारी फार अत्यल्प आहे. त्यामुळे मळणी यंत्राच्या इंधन खर्चाबरोबर मजुरांना पोत्यामागे देण्यात येणारी मजुरी सुद्धा निघणे कठीण आहे. दुसरीकडे रोवणी, कापणी आणि बांधणीचे यावर्षी वाढलेले मजुरीचे दर, कीटकनाशकांच्या बेसुमार किंमतीचा खर्च या सर्व बाबींचा विचार केल्यास धान उत्पादकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.
विमा काढूनही लाभ मिळणार की नाही ?
यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत बँक व सेवा सहकारी सोसायट्यांकडून धान पिकाचा विमा उतरवून घेतला आहे. त्याकरिता हप्ता सुद्धा भरलेला आहे. परंतु उत्पादन फक्त २० टक्केही झाले नसताना आजपर्यंत शासनाचा व विमा कंपनीच्या कोणत्याही प्रतिनिधीने प्रत्यक्ष बांधावर जावून पंचनामे केले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार की नाही, या विवंचनेत शेतकरी आहेत.

Web Title:  Farmer Bazara due to the reduction of the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.