शेतकरी कर्जमाफी ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:56 PM2019-06-10T22:56:26+5:302019-06-10T22:57:33+5:30

मागील दोन वर्षांपूर्वी शासनाने केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकºयांचे बँकेचे व्यवहार रखडले आहे. कर्जमाफी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप शेतकºयांकडून केला जात आहे.

Farmer debt forgiveness leads to headache | शेतकरी कर्जमाफी ठरतेय डोकेदुखी

शेतकरी कर्जमाफी ठरतेय डोकेदुखी

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा आरोप : हंगाम सुरू होऊनही कर्ज मिळत नसल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील दोन वर्षांपूर्वी शासनाने केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेचे व्यवहार रखडले आहे. कर्जमाफी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
सन २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु केली. त्या योजनेत १ लाख ५० हजारांच्या खाली असलेले कर्ज माफ करण्यात आले. दीड लाखांच्यावर असलेल्या कर्जाकरिता एकमूस्त रक्कम भरून दीड लाखांची कर्जमाफी मिळवून घेण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार काही शेतकºयांनी वरील रक्कम भरून कर्जमाफीची प्रतिक्षा सुरू केली. मधल्या काळात आलेल्या ग्रीन याद्यांमध्ये अत्यल्प कमी शेतकऱ्यांची नावे आली आहे. परंतु, त्यांनाही कर्ज मिळाले नाही. शेती हंगामाला हळूहळू प्रारंभ होत आहे. बँकेकडून कर्ज मिळेल या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांना आता कर्ज मिळण्याची कोणतीही आशा दिसत नसल्याने त्या शेतकऱ्यांनी उधारीवर बियाणे व खते मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्यात यश येताना दिसत नसल्यामुळे सावकाराच्या उंबरठ्यावर जाण्याची वेळ आली आहे. सन २०१७ मध्ये कृषी कर्ज उचलेल्या ज्या शेतकऱ्यांना २०१८ च्या हंगामात कर्ज मिळाले नाही. पुनर्गठण करण्याची मागणी आहे.
सुनावणीनंतरही नाही कार्यवाही
ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. त्या शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्जाच्या छायांकित प्रतिसह अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले. अर्जावर सुनावणी झाली. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्जमाफी होणार की नाही तसेच नव्या हंगामात पैशाची जुळवाजळव कुठून करावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

Web Title: Farmer debt forgiveness leads to headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.