वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 04:12 PM2019-12-12T16:12:56+5:302019-12-12T16:13:18+5:30

राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेंबुरवाही नियत क्षेत्रच्या कक्ष क्रमांक 168 मध्ये गुरुवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास वाघाने हल्ला करून चिचबोडी येथील शेतकरी देविदास चंद्रू तलांडे यास जखमी केल्याची घटना घडली.

Farmer injured in tiger attack; Events in Chandrapur district | वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेंबुरवाही नियत क्षेत्रच्या कक्ष क्रमांक 168 मध्ये गुरुवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास वाघाने हल्ला करून चिचबोडी येथील शेतकरी देविदास चंद्रू तलांडे यास जखमी केल्याची घटना घडली. 15 दिवसातील ही दुसरी घटना चिचबोली शिवारात घडली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण असून कापूस वेचणी आणि धान कापणी कामे खोळंबली आहेत
राजुरा तालुक्यातील जोगापूर वनक्षेत्रात मागील काही महिन्यापासून वाघाचे मुक्त संचार असून वाघाची संख्या वाढली असल्याचे समजते. हा महिना वन्यप्राणीचा संक्रमण काळ असल्याने ते हिंस्त्र असतात. परिणामी याच महिन्यात शेतात राखण करणाऱ्या मूर्ती येथील श्रीहरी साळवे याचेवर हल्ला करून जागीच ठार केले होते, तर त्याच आठवड्यात चिचबोली येथील शामराव टेकाम याचेवरही वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले या घटनेमुळे वन कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त गस्त वाढविली आहे परंतु वाघ या भागातील शेत शिवारात रोजच दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आणि इतर नागरिकांत वाघाची दहशत आहे. अशातच आज दुपारी परत चिचबोली येथे वाघाचे हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली. यामुळे जनतेत वन विभाग बाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

Web Title: Farmer injured in tiger attack; Events in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ