कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी संघटनेचा झेंडा
By admin | Published: February 16, 2016 01:13 AM2016-02-16T01:13:08+5:302016-02-16T01:13:08+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जांगापैकी १४ जागा जिंकून शेतकरी संघटनेने बाजार
राजुरा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जांगापैकी १४ जागा जिंकून शेतकरी संघटनेने बाजार समितीवर आपला झेंडा फडकावला आहे.सोमवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला.
सहकारी संस्था मतदार संघामध्ये एकूण १४ उमेदवार उभे होते. त्यामधुन ७ उमेदवार निवडावयाचे होते. सातही उमेदवार शेतकरी संघटनेचे निवडून आलेत. विजयी उमेदवारामध्ये बाळा इसनकर १०९, हरिश्चंद्र आवारी १०८, नारायण गड्डमवार १२०, नानाजी पोटे - ११०, रमेश बोबडे १२८, हरिदास बोकुटे ११४, दत्ता हिंगाणे याांना १११ मते मिळाली. या गटामधील काँग्रेस- भाजपा युतीचे पराभूत उमेदवार विजय उपरे ८४, श्यामराव कोटनाके ८७, शंकर गोनेलवार ८८, सुनील देशपांडे ९२, विनायक देशमुख ९५, दिलीप वांढरे ९७, प्रभाकर साळवे ९१ मते घेतली. सहकारी संस्था मतदार संघातून शेतकरी संघटनेचे विजयी उमेदवार मीरा काळे ११९, शंकुतला देरकर ११३, पराभूत उमेदवार- नंदा गेडाम, माया भोयर, मतदार संघ गटामधून शेतकरी संघटनेचे कवडू पोटे यांनी काँग्रेस-भाजपा युतीच्या आबाजी ढुमने यांना ५ मतांनी पराभूत केले. कवडू पोटे यांना ११८ मते तर आबाजी ढुमणे यांना १०३ मते मिळाली.
शेतकरी संघटनेचे पुंजाराम बरडे यांनी काँग्रेसचे साईनाथ बतकमवार यांना ७ मतांनी पराभूत केले. साईनाथ बतकमवार यांना १०७ तर पुंजाराम बरडे यांना ११३ मते मिळाली.
ग्रामपंचायत मतदार संघातून काँग्रेस-भाजपा - शिवसेना युतीचे उमेदवार अविनाश जेनेकर २७३, संतोष झाडे २६७, किसन टेकाम २५९, मारोती सिडाम २८२, चार उमेदवार विजयी झाले. शेतकरी संघटनेचे पराभूत उमेदवार संतोष डोंगे १७०, दादा वडस्कर १७०, आनंद चहारे १९७, प्रकाश वेडमे १७२ हे आहेत.
व्यापारी अडते मतदार संघातून शेतकरी संघटनेचे मनमोहन सारडा ७७, विठ्ठल पाल ५९ विजयी झाले. पराभूत उमेदवार सतीश कोमरवेलीवार १७, विष्णुप्रसाद नावंधर २१, महेश रेगुंडवार ११, रामअवतार सोनी ४, हमाल मापारी मतदार संघातून शेतकरी संघटनेचे राजू पहानपटे यांनी काँग्रेसच्या सय्यद सखावत अली यांना १ मतानी पराभूत केले. राजू पहानपटे यांना १३ मते तर सय्यद सखावत अली यांना १२ मते प्राप्त झाली. विजयानंतर शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. याप्रसंगी प्रभाकर दिवे, नगरसेवक प्रा. अनिल ठाकुरवार, सुभाष रामगिरवार, मधुकर चिंचोलकर, घनशाम हिंगाणे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीत कॉंग्रेस- भाजपा युतीला मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालावर भविष्यातील राजकीय आराखडे बांधले जात आहे. (शहर प्रतिनिधी)