शेतकरीच देशाचा खरा आधारस्तंभ!
By admin | Published: January 17, 2017 12:36 AM2017-01-17T00:36:38+5:302017-01-17T00:36:38+5:30
विकासाची सुरुवात ही ग्रामीण भागातून होत असते. जिद्दीने व चिकाटीने कष्ट करणारी माणसे हि गावातीलच असतात.
हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : नांदगाव येथे सत्कार समारंभ
आवाळपुर : विकासाची सुरुवात ही ग्रामीण भागातून होत असते. जिद्दीने व चिकाटीने कष्ट करणारी माणसे हि गावातीलच असतात. त्यांची नाळ ही मातीशी जुळली असते. देशाची प्रगती ही शेतकऱ्यांचा हाती आहे. शेतकऱ्यांचा मेहनतीने आणि कष्टानेच भारत देश हा प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे देशाचा खरा आधारस्तंभ हा शेतकरीच आहे. असे प्रतीपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
रविवारी नांदगाव (सुर्य) येथे आयोजीत सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात ना.हंसराज अहीर व आ. संजय धोटे यांनी शेतात नांगर चालवून केली. यावेळी रत्नागिरी सिमेंट कंपनीने हस्तांतरीत केलेल्या ४३ शेतकऱ्यांच्या ७६ हेक्टर जमिन २० वषार्तील संघषार्ने मिळवून दिल्याबद्दल केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांचा सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीर उभे राहून त्यांना आधार दिल्याबद्दल घनशाम निखाडे, महेश्वर रणदिवे, रामदास कोहळे, सरपंच आशाताई थेरे, उपसरपंच संजय चौधरी, त्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला.
ना. हंसराज अहीर पुढे म्हणाले, कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होवू देणार नाही. आपण नेहमीच शेताकर्यांचा पाठीशी उभे राहू. त्यांचा जमिन कवडी मोल भावाने विकू देणार नाही. तसेच अंबूजा सिमेंट कंपनीतील प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावू,अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी दिली. आ. संजय धोटे म्हणाले, ग्रामीण भागातील विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. गावातील रस्त्याचा विकास हे आमचे ध्येय असून भोयागाव ते गडचांदूर आणि राजूरा ते आदिलाबाद या रस्त्याला मंजुरी मिळाली असून लवकरच निधीमंजूर करुन काम सुरू करण्यात येईल. तसेच कवठाळा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र लवकर सरू करण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी राहुल सराफ, राजू घरोटे, अरुण मस्की, सुनील उरकुडे, मनोहर कुलसंगे, वाघुजी गेडाम, सतीश उपलेन्चवार, विशाल गज्जलवार, सरपंच आशा थेरे, उपसरपंच संजय चौधरी, अनिल पोडे, अरुण मडावी, कवडू जरिले आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन महेंद्र चौधरी, प्रास्ताविक पुरुषोत्तम निब्रड व संजय चौधरी तर आभार संतोष पोडे यांनी मानले. (वार्ताहर)