आर्वी येथे शेतकरी महिला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:50 AM2021-02-18T04:50:45+5:302021-02-18T04:50:45+5:30
या कार्यक्रमाच्या उदघाटक आर्वी येथील सरपंच शालूताई लांडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुभाष काटवले, शैला मेश्राम, नेताजी ...
या कार्यक्रमाच्या उदघाटक आर्वी येथील सरपंच शालूताई लांडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सुभाष काटवले, शैला मेश्राम, नेताजी कपाडे, मोरेश्वर मालेकर, मारोती काकडे, सूरज माथनकर , राहुल खेडेकर, भाऊराव चौथले, वंदना मुसळे , सारिका तंलाडे, रत्नमाला महाकूलकर, शारदा निललावार उपस्थित होते.
सरपंच शालूताई लांडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आर्वी गावाला आदर्श गाव घडविण्यासाठी संपूर्ण लोकसहभागातून कार्य सुरू आहे. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. जैविक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज असून, आजच्या परिस्थितीत महिला चांगल्याप्रकारे शेती करीत असून, महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी व माहितीकरिता महिला शेतकरी मेळाव्याची गरज आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपसरपंच सुभाष काटवले यांनी नारी शक्ती काय असते, याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी शैला मेश्राम, विशाल भोगावार यांनी शेतकरी महिलांना शेतीविषयी मार्गदर्शन केले. संचालन रूपेश गेडेकर, प्रास्ताविक गोपाल जंबुलावार, आभार प्रदीप बोबडे यांनी मानले.