शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:44 AM2020-12-15T04:44:12+5:302020-12-15T04:44:12+5:30

पन्न्या फेकणाऱ्यांवर कारवाई नाही चिमूर : नगर पालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लास्टिक पन्न्यांचा ...

Farmers are ignorant about various schemes | शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ

शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ

Next

पन्न्या फेकणाऱ्यांवर कारवाई नाही

चिमूर : नगर पालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लास्टिक पन्न्यांचा वापर करतात. अनेक जण दुकान बंद झाल्यानंतर या पन्न्या व प्लास्टिक कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकतात. अशांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मातीच्या ढिगाऱ्यावर

वन्यप्राण्यांचा वावर

गोवरी : परिसरातील वेकोलिने तयार केलेल्या मातीच्या ढिगाºयावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडूपे तयार झाल्याने या ठिकाणी दिवसरात्र वन्यप्राण्यांचा संचार सुरू आहे. जंगलालगत असलेली शेती वन्यप्राण्यांकडून उद्ध्वस्त केली जात असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे.

मानव मिशन योजनेची व्याप्ती वाढवा

नेरी : आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थिनींनी बसद्वारे शाळेत जाता यावे, याकरिता मानव मिशन योजना सुरू करण्यात आली. शिवाय, विद्यार्थिनींनी सायकलसाठी तीन हजार रुपयाची मदत मिळते. मात्र ही मदत तोकडी आहे, असा आरोप नेरी परिसरातील पालकांनी केला आहे.

रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा कोलमडली

चिमूर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे़ बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे़ आर्थिक परिस्थितीमुळे खासगी रुग्णालयात जाणे शक्यच नाही़ शासनाकडून आरोग्य केंद्रांना मोठा निधी दिला जात आहे़ पण, मूलभूत सुविधा मिळत नसल्याने रुग्ण हैराण झाले आहेत.

बसथांबा नसल्याने प्रवाशांचे हाल

मूल : चिमढा येथे जलद बस थांबत नसल्यामुळे नागरिकांना बराच वेळ ताटकळत राहावे लागत आहे. चिमढा हे गाव रस्त्यावर असून माध्यमिक शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मूल किंवा सावली येथे जावे लागते. मात्र चिमढा येथे सुपर बस थांबत नसल्याने ऐन परीक्षेच्या काळात शाळेत जाण्यास अडचणी येत आहेत.

बिनबा वॉर्डात घाणीचे साम्राज्य

चंद्रपूर : बिनबा वार्डात विविध ठिकाणी घाण पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मातंग मोहल्ला व बिनबा वार्डातील नाल्याचा उपसा होत नाही. त्यामुळे नाल्या तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे मनपा स्वच्छता कर्मचाºयांना पाठविण्याची मागणी मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे जिल्हा सचिव रवी डोंगरे, अध्यक्ष राजू आमटे, भोला साळवे आदींनी केली आहे.

रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा कोलमडली

चिमूर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे़ बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे़ आर्थिक परिस्थितीमुळे खासगी रुग्णालयात जाणे शक्यच नाही़ शासनाकडून आरोग्य केंद्रांना मोठा निधी दिला जात आहे़ पण, मूलभूत सुविधा मिळत नसल्याने रुग्ण हैराण झाले आहेत.

सौर ऊर्जेचे कुंपण नुदानावर द्यावे

चिमूर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जंगलाला लागून आहे. वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. शिवाय, वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत. लॉकडाऊन असले तरी शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करत आहेत. अशावेळी वन्य प्राण्याचे हल्ले होऊ शकतात. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी वनविभागाने शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरी कुंपन किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ग्रामीण भागातील घरकूल बांधकाम रखडले

चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत शेकडो नागरिकांना घरकूल मंजूर झाले. परंतु पंचायत समितीच्या नियोजनामुळे धनादेश मिळाले नाही. शेकडो लाभार्थी घरकूलसाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवित आहेत. मात्र, धनादेश मिळाला नाही. काही व्यक्तींची नावे चुकीने वगळण्यात आली. दरम्यान, कोरोनामुळे टाळेबंदी लागल्याने प्रशासकीय कामे ठप्प झाली. त्यामुळे घरकूल बांधकाम निधीअभावी रखडली आहेत.

धोकादायक खड्डा तात्काळ बुजवावा

सिंदेवाही : शहरातील पाथरी मार्गावरील रस्त्याच्या कडेला खड्डा पडला आहे. त्यामध्ये अवकाळी पावसाचे पाणी साचले. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. यामध्ये डुकरांचा वावर सुरू झाल्याचे दिसून येत आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी हा खड्डा बुजविणे गरजेचे आहे.

पडोली परिसर प्रदूषणामुळे त्रस्त

पडोली : परिसरातील विविध उद्योगांमुळे नागरिकांना प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. हा परिसर एमआयडीच्या हद्दीत येतो. या ठिकाणी विविध वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी उद्योग व्यवस्थापनांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र, प्रदूषण रोखण्यासाठी अद्याप उपाययोजना केल्या नाही.

Web Title: Farmers are ignorant about various schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.