शेतकऱ्यांना आता अपघात विम्याचे संरक्षण कवच

By admin | Published: May 23, 2016 12:59 AM2016-05-23T00:59:29+5:302016-05-23T00:59:29+5:30

शेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा अंपगत्व येते.

Farmers are now protected from accident insurance | शेतकऱ्यांना आता अपघात विम्याचे संरक्षण कवच

शेतकऱ्यांना आता अपघात विम्याचे संरक्षण कवच

Next

कृषी खात्याची योजना : अनेक लाभार्थी वंचित
सिंदेवाही : शेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा अंपगत्व येते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयास आर्थिक लाभ देण्यासाठी कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना कार्यान्वित केली आहे.
सदर योजनेच्या नामाभिधान आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना असे करण्यात आले आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच ठरली आहे. शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना आर्थिक स्वरुपात दोन लाख रुपये, एक अवयव अपंग झाल्यास एक लाख रुपये, दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये लाभ देण्याची तरतुद या विमा योजनेत आहे. विम्याचा कालावधी १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत ठेवण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महसूल कागदपत्रे, सातबारा व फेरफार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. अपघात झाल्यानंतर संबंधित कृषी पर्यवेक्षकामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. सदर प्रस्ताव सादर करण्याची कोणत्याही विविज्ञ किंवा एजंट नेमण्याची गरज नाही. विमा संरक्षणासाठी रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, विषबाधा, वीज पडणे, उंचावरुन पडणे, सर्पदंश, प्राणीदंश,खून, जनावरांचा हल्ला, दंगल अश्या प्रकारच्या अपघाताचा समावेश आहे. (पालक प्रतिनिधी)

Web Title: Farmers are now protected from accident insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.