शेतकरी यंदाही आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:00 AM2020-09-19T05:00:00+5:302020-09-19T05:00:22+5:30
वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान उत्पादित मालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी पारंपारिक पिकांकडे वढले आहेत. मात्र सोयाबिन कमी खर्चाचे पीक असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने यंदा सोयाबिनच्या व कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततधार पावसामुळे पिकांवर खोडकिडा, चक्रीभुंगा अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फवारणीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यंदा सोयाबिन व कापसाच्या पेऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आहे. मात्र कर्जमाफीनंतरचा हा पहिलाच हंगाम असूनही शेतकऱ्यांपुढे येत असलेल्या नवनव्या अडचणीमुळे यावर्षीही आर्थिक अडचणींना सामोर जावे लागण्याची शक्यता शेतकरी वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.
नेहमीच शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांना सामोर जावे लागते. वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान उत्पादित मालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी पारंपारिक पिकांकडे वढले आहेत. मात्र सोयाबिन कमी खर्चाचे पीक असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असल्याने यंदा सोयाबिनच्या व कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततधार पावसामुळे पिकांवर खोडकिडा, चक्रीभुंगा अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फवारणीच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक पिवळे पडले. शेगांना गळती लागली आहे.
मृग नक्षत्राच्या पावसावर सोयाबीनची पेरणी झाली. समाधानकारक पाऊसही पडला. पीक बहरायला लागले. पिकांची वाढही झाली. शेंगा लागल्या. मात्र वातावरणातील सततच्या बदलामुळे शेंगाच भरल्याच नाही. परिणामी शेतकरी पुन्हा हताश झाले आहेत. यंदा झालेल्या शेतकरी कर्जमाफीमुळे चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र पीकाची सध्याची परिस्थिती बघता केलेला सोयाबीनवर केलेला खर्चही निघतो की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचे अर्थच्रक कोलमडेल की काय, अशी भीती व्यक्त होताना दिसून येत आहे.
उताऱ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
यंदा अनेक शेतकरी सोयाबीन पिकांकडे वळले आहेत. परंतु, यंदा हवामानामुळे हे पीक न परवडणारे ठरतील की काय, अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. काहींनी उभ्या पिकांत जनावरे सोडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही शेतात पीक उभे आहे. अवघ्या काही दिवसावर मळणी पाहता किती उतारा होतो. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आधिच सततची नापिकी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खरिपाच्या उत्पन्नावर आर्थिक देवाण-घेवाण अवलंबून असते. मात्र यावर्षी आलेल्या सततच्या संकटामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.