शेतकऱ्याचे स्वयंचलित कुक्कुट पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:39 PM2018-04-30T23:39:21+5:302018-04-30T23:39:37+5:30

सर्वच क्षेत्रात मनुष्य बळाचा वापर कमी केलाा जात आहे. काही क्षेत्रात मनुष्यबळ उपलब्घ होत नाही, अशा ठिकाणी स्वयंचलित यंत्र लावून व्यवसाय थटला जातो. अशातच एका शेतकऱ्याने शेतात स्वयंचलित कुक्कुट पालन प्लॅन्ट उभारला आहे. अशा प्रकारचा हा प्लान्ट चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला असल्याचे मानले जात आहे.

Farmer's automatic poultry farming | शेतकऱ्याचे स्वयंचलित कुक्कुट पालन

शेतकऱ्याचे स्वयंचलित कुक्कुट पालन

Next
ठळक मुद्देअनेकांसाठी प्रेरणादायी : चारा-पाणी स्वयंचलित यंत्राद्वारे

प्रवीण खिरटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : सर्वच क्षेत्रात मनुष्य बळाचा वापर कमी केलाा जात आहे. काही क्षेत्रात मनुष्यबळ उपलब्घ होत नाही, अशा ठिकाणी स्वयंचलित यंत्र लावून व्यवसाय थटला जातो. अशातच एका शेतकऱ्याने शेतात स्वयंचलित कुक्कुट पालन प्लॅन्ट उभारला आहे. अशा प्रकारचा हा प्लान्ट चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला असल्याचे मानले जात आहे.
कुक्कुट पालन व्यवसाय करीत असताना सुलभ नियोजन करावे लागते. त्यातील महत्वाचा घटक स्वच्छता, पाणी, खाद्य, औषधी तसेच वातावरणात संयम ठेवला जातो. याकरिता प्रशिक्षित मजूर ग्रामीण भागात मिळणे दुरापास्त असते. त्यामुळे वरोरा शहरापासून काही अंतरावर राहुल विधाते या शेतकऱ्याने पोल्ट्री फार्म उभारला. हा व्यवसाय संपूर्णपणे मजुरांकडून केला जात असलयाने त्यांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागत होता. सध्या त्यांनी २२० मीटर लांब व ४० मीटर रूंद या आकरात शेडची उभारणी केली आहे. सध्या या शेडमध्ये दहा हजार कोंबडीचे पिल्ले आहेत. या पिलांना चारा, औषधी, पाणी स्वयंचलित यंत्राद्वारे देण्यात येत आहे. पिल्ले असलेल्या ठिकाणी धानाचा कोंडा खाली टाकण्यात आला असून पिल्लाची विष्ठा त्या कोंड्यात मिसळत असल्याने घाण होत नाही. खाद्याचे व पाण्याचे भांडे भरले तर स्वयंचलित यंत्र आपोआप बंद होते. या शेडमध्ये तीन मोठे कुलर लावण्यात आले असून एक जनरेटरही आहे. स्वयंचलित यंत्रामध्ये बिघाड आल्यास सायरन वाजत असतो व संचालकांच्या भ्रमणध्वनीवर मॅसेज येत असल्याने तात्काळ दुरूस्ती केली जाते. सुरक्षेकरीता संपूर्ण प्लान्टला जाळी लावण्यात आली आहे. आतमध्ये जाताना दारानजिक पाण्याचे टाके आहे. त्यात पाय धुवून जावे लागते. ३० ते ३५ दिवसात पिल्लाचे वजन दोन ते अडीच किलो होत असून छत्तीसगडमधील कंपनी पिल्ले व खाद्य पुरविते. विधाते यांचा हा जोडधंदा इतर शेतकºयांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

मेंटनन्स चांगले केल्यास नफा निश्चितच मिळतो. स्वयंचलित प्लान्टमुळे आपणाला मोठा फायदा होत आहे.
- राहुल विधाते, शेतकरी.

Web Title: Farmer's automatic poultry farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.