आधारभुत धान खरेदीच्या बोनसपासून शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:04+5:302021-04-05T04:25:04+5:30
पिंपळगाव(भो) : शासनाने शेतकऱ्यांकडून आधारभुत किमतीत धान खरेदी केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना खरेदीच्या बोनसचे पैसे देण्यात आलेले नाही. त्यामुळे ...
पिंपळगाव(भो) : शासनाने शेतकऱ्यांकडून आधारभुत किमतीत धान खरेदी केले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना खरेदीच्या बोनसचे पैसे देण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
यावर्षीच्या खरीप धान पिक हंगामात कधी नव्हे एवढा पैसा खर्च करुन जोमात धानाचे पीक उभे केले. मात्र गोसेखुर्द धरणातून पाणी सोडल्याने ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठच्या परिसरात पूर परिस्थीती निर्माण होऊन पीक पाण्याखाली गेले. त्यात कित्येक धानाचे पीक सडले. मात्र किटकनाशकाची व रासायनिक खतांच्या फवारणीने धानाचे पिक उभे केले. त्यावर रोगराई आली. मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने संकटाचा सामना करून धान पिकविले. एकरी २५ पोते शासनाने घेतले. उर्वरित धान विकावे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. आधारभुत धान खरेदी केंद्रावर धान नेले. मात्र गोडाऊन फुल्ल झाल्याचे सांगण्यात आले. तरीही अनेक शेतकऱ्यांचे धान शासनाने विकले. मात्र बोनसचे पैसे शासनाने त्वरित द्यावे, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य नरेंन्द्र दुपारे यांनी केली आहे.