पकडीगुड्डम प्रकल्पाकडून शेतकऱ्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:05 PM2018-05-22T23:05:19+5:302018-05-22T23:06:18+5:30

कोरपना तालुक्यातील माणिकगड पहाडालगत पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला. हजारो हेक्टर सिंचनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने शेकडो शेतकºयांना पुरेसे पाणी मिळत नाही. मूबलक निधी, रिक्त पदे आणि नियोजनाच्या अभावामुळे सिंचनाची व्याप्ती वाढू शकली नाही. शेतीला पाणी मिळत नसल्याने शेकडो एकर जमीन कोरडवाहू आहे.

Farmers' disappointment from Pakdiguddam project | पकडीगुड्डम प्रकल्पाकडून शेतकऱ्यांची निराशा

पकडीगुड्डम प्रकल्पाकडून शेतकऱ्यांची निराशा

Next
ठळक मुद्देकालव्याअभावी सिंचन घटलेशासन व लोकप्रतिनिधींची उदासिनताविविध कामे रखडली

जयंत जेनेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हाळगाव : कोरपना तालुक्यातील माणिकगड पहाडालगत पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला. हजारो हेक्टर सिंचनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने शेकडो शेतकºयांना पुरेसे पाणी मिळत नाही. मूबलक निधी, रिक्त पदे आणि नियोजनाच्या अभावामुळे सिंचनाची व्याप्ती वाढू शकली नाही. शेतीला पाणी मिळत नसल्याने शेकडो एकर जमीन कोरडवाहू आहे.
पकडीगुडुम धरणात प्रचंड गाळ साचला आहे. त्यामुळे पाण्याची साठवणूक योग्यरित्या होत नाही. कालवे बुजल्याने शेतामध्ये पाणी पोहोचायला अडचणी निर्माण झाल्या. ेसिंचनाची सोय असूनही कालव्याअभावी शेकडो शेतकºयांना धरणातील पाण्याचा लाभ घेता येत नाही. काही शेतकºयांच्या जमिनी कोरडवाहू झाल्या आहेत. या प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी १९९० ला सोनुर्ली येथे प्रकल्प कार्यालय व कर्मचारी वसाहत तयार केली गेली. मात्र प्रकल्पाच्या निर्मितीपासूनच ही वसाहत ओस पडली आहे. वसाहतीचे दारे, खिडक्या चोरट्यांनी लंपास केली. संबंधित अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष असल्याने कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेली वसाहत सध्या बेवारस आहे. सिंचन प्रकल्पाची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी वनसडी किंवा कोरपना येथे कार्यालय उभारणे गरजेचे होते. पण, प्रकल्पासून २० किमी अंतरावरील गडचांदूर येथे कार्यालय उभारण्यात आले. या प्रकल्पाकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही, अशी स्थिती झाली. अमलनाला व पकडीगुड्डम प्रकल्पामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येवू शकते. परंतु, नियोजन व निधीची तरतूदीकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकºयांचा अपेक्षाभंग झाला आहे. प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाºया पाटबंधारे विभागात कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेवून शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. सिंचन प्रकल्पाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण केल्यास पर्यटनाला चालना मिळू शकते. लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळा करून आहे.
शेकडो एकर जमीन कोरडवाहू
कोरपना तालुक्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संंख्या सर्वाधिक आहे. कापूस व सोयाबिनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, ही शेती पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेतल्यास शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येवू शकते. या प्रकल्पाचा अनेक शेतकºयांना लाभ मिळत आहे. पण, सिंचनाखालील जमिनीचे हेक्टरी क्षेत्र अद्याप वाढले नाही. कोरडवाहू शेती करणाºया शेतकऱ्यांचे प्रमाण आजही चिंताजनक असल्याचे दिसून येते. त्यामुळे या धरणासाठी मूबलक निधी देवून शेतकऱ्यांची स्थिती बदलावी, अशी मागणी केली जात आहे.
दीर्घकालीन नियोजनातूनच बदलणार स्थिती
तालुक्याच्या भौगोलिक व कृषी स्थितीनुसार मोठ्या सिंचन प्रकल्पाची गरज होती. पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पामुळे अपेक्षा पूर्ण झाली. पाटबंधारे विभागाने प्रकल्पाकडे लक्ष दिल्याने बरीच कामे मार्गी लागली. पण, आर्थिक दुष्टचक्रात अडकलेल्या शेतीला बाहेर काढण्यासाठी सिंचनाची व्याप्ती वाढविण्याशिवाय पर्याय नाही. त्याकरिता उपलब्ध निधीचा योग्य वापर करून दीर्घकालीन नियोजन करणे काळाची गरज आहे. त्यातूनच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येईल.
पाठपुराव्याशिवाय पर्याय नाही
पकडीगुड्डम हा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. तालुक्यातील पारंपरिक शेतीची सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे कृषीसिंचन साध्य होवू शकते. नगदी पिके घेणाºया शेतकऱ्यांची संख्या वाढण्यास मोठा वाव आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा, करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली.

Web Title: Farmers' disappointment from Pakdiguddam project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.