शेतकऱ्यांनो ३० जून पर्यंत 'केवायसी' करा; अभावी पैशे शासनाकडे परत जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 04:25 PM2024-06-28T16:25:07+5:302024-06-28T16:30:21+5:30

Chandrapur : वर्ष लोटूनही शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित; 'केवायसी' अभावी २०३२ शेतकऱ्यांची आर्थिक मदत थांबली

Farmers do 'KYC' by June 30; There is a possibility that the money will go back to the government | शेतकऱ्यांनो ३० जून पर्यंत 'केवायसी' करा; अभावी पैशे शासनाकडे परत जाण्याची शक्यता

Farmers deprived of financial assistance even after year

बी. यू. बोर्डेवार
लोकमत न्यूज नेटवर्क 
राजुरा :
मागील वर्षी जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झाले. शासनातर्फे दिले जाणारी आर्थिक मदत अनेक शेतकऱ्यांचे बँक खात्याची 'केवायसी' झाली नसल्यामुळे जमा झालेले नाही. यात राजुरा तालुक्यातील केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची संख्या दोन हजार ३२ एवढी आहे.


शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी आलेले लाखो रुपये 'केवायसी' अभावी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत केवायसी करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी केले आहे.


मागील खरीप हंगामामध्ये जुलै ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाने तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे नदी व नाल्याकिनारी असणाऱ्या शेतीचे फार मोठे नुकसान झालेले होते. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आल्यामुळे उभी पिके नष्ट झालेली होती.


यात नदीकाठच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. याबाबत महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केलेले होते. तालुक्यात पाच हजार ७६५ लाभार्थ्यांना शासनातर्फे आर्थिक लाभ मिळणार होता. गाळ साचून, जमीन खरवडून व अतिपावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाल्याने त्यांना हेक्टरी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. त्याअनुषंगाने ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला थेट जमा होणार होती. यामध्ये आतापर्यंत दोन हजार ५५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा झाली आहे, तर एक हजार ४७८ शेतकऱ्यांचे केवायसी प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यावर काही दिवसांत रक्कम जमा होणार आहे; मात्र अजूनही तब्बल दोन हजार ३२ लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खात्यांचे केवायसी नसल्यामुळे लाखो रुपयांची रक्कम ही शासनाकडे अजूनही जमा आहे. काही कालावधीनंतर ही रक्कम शासनाला जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल विभागाने संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी तत्काळ केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. 


तांत्रिक अडचणीच्या नावावर तब्बल वर्षभरानंतर अजूनही शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक मदत मिळाली नसल्यामुळे अनेक शेतकरी हतबल आहेत. जेमतेम आर्थिक मदत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असताना तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे ते त्रस्त झाले आहेत.


संमतीपत्र नसलेल्यांनाही मदत नाही
याशिवाय सामायिक खातेदारांचे संमतीपत्र नसल्यामुळेही शासनाकडून मिळणारी रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची माहिती आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामावर संकट ओढवले आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी झालेली आहे, तर दुसरीकडे मागील वर्षीच्या नैसर्गिक आपत्तीत झालेले नुकसानभरपाईसुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही. अशा आर्थिक संकटात बळीराजा सापडल्या असल्याने आता 'केवायसी'चे नवीन संकट त्यांच्यासमोर उभे आहे.


तालुक्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी जुलै, ऑगस्ट २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत वाटप प्रक्रिया शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन डीबीटी पोर्टलद्वारे सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यातील २२५५ शेतकरी बांधवांना अनुदान रक्कम प्रत्यक्ष खात्यामध्ये जमा झाली असून १४७८ शेतकरी बांधवांचे ई-केवायसी झाली असून लवकरच रक्कम खात्यामध्ये जमा होईल.
- डॉ. ओमप्रकाश गोंड, तहसीलदार, राजुरा

Web Title: Farmers do 'KYC' by June 30; There is a possibility that the money will go back to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.