धानाचे चुकारे अडल्याने शेतकऱ्यांची अर्थकोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:30 AM2021-05-07T04:30:13+5:302021-05-07T04:30:13+5:30

केंद्र सरकार व राज्यातील हमीभावावर ५०० रुपये बोनस देण्याचे मान्य करून शासनाने मार्केटिंग फेडरेशनमार्फत धान खरेदी करण्यात आली. २० ...

Farmers' financial woes due to grain shortages | धानाचे चुकारे अडल्याने शेतकऱ्यांची अर्थकोंडी

धानाचे चुकारे अडल्याने शेतकऱ्यांची अर्थकोंडी

Next

केंद्र सरकार व राज्यातील हमीभावावर ५०० रुपये बोनस देण्याचे मान्य करून शासनाने मार्केटिंग फेडरेशनमार्फत धान खरेदी करण्यात आली. २० दिवसांत रोहिणी नक्षत्र लागणार असून, धानाचा खरीप हंगाम सुरू होईल. कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतकरी त्रस्त आहे. या हंगामासाठी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करावी लागणार आहेत; पण धानाचे चुकारे व बोनस शासनाने अद्याप दिले नाही. शासनाने मार्केटिंग फेडरेशनमार्फत केलेल्या धान खरेदीचे चुकारे तातडीने देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार वामनराव चटप, प्रभाकर दिवे, अरुण नवले, राजेंद्रसिंह ठाकूर, अरुण मुनघाटे, आदींनी राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पणन संचालक व पणन सचिवांकडे केली आहे. चुकारे देण्यास विलंब झाल्यास शेतकरी सावकारांच्या दारी जाण्याचा धोकाही लक्षात आणून दिला आहे.

Web Title: Farmers' financial woes due to grain shortages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.