शिंगाड्याच्या शेतीतून मिळते शेतकऱ्याला लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:29 AM2021-08-23T04:29:46+5:302021-08-23T04:29:46+5:30

तळोधी बा : नागभीड तालुक्यातील सोनुली बु.येथील शेतकरी यशवंत मांढरे यांनी धानाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे भाड्याने घेतलेल्या शेतात ...

Farmers get lakhs of income from shingada farming | शिंगाड्याच्या शेतीतून मिळते शेतकऱ्याला लाखोंचे उत्पन्न

शिंगाड्याच्या शेतीतून मिळते शेतकऱ्याला लाखोंचे उत्पन्न

Next

तळोधी बा : नागभीड तालुक्यातील सोनुली बु.येथील शेतकरी यशवंत मांढरे यांनी धानाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे भाड्याने घेतलेल्या शेतात शिंगाड्याची लागवड केली असून, यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केलेली आहे. धान लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असून, उत्पन्न घेतल्यानंतर त्याच्या मालाला योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाला मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागते. त्यामुळे धान शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तळोधी बा. येथील जयस्वाल यांच्या एक एकर शेतात शिंगाड्यांची लागवड करण्यात आली आहे. शिंगाडे शेतीसाठी पाण्याची मुबलक आवश्यकता असते. लागवडीसाठी खर्च कमी येतो तसेच तसेच धानापेक्षा रोगराई सुद्धा कमी असते. शिंगाड्याच्या वेलाला शिगांडे लागत असून, जवळजवळ एका एकरात एक लाख रुपयांच्यावर शिंगाड्याचे उत्पादन होण्याची शक्यता शेतकरी यंशवत मांढरे यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली आहे.

220821\img_20210820_092335.jpg

शेतात शिंगाडे लागवड केलेला फोटो

Web Title: Farmers get lakhs of income from shingada farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.