शेतीच्या प्रगतीसाठी महिला शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:24 AM2019-06-13T01:24:50+5:302019-06-13T01:25:04+5:30
शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, यासाठी बियाणे व तंत्रज्ञानाचा वापर करताना संभ्रम निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्ह्यात शेतकरी व शेतकरी महिला शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या शेती शाळांसाठी शेतकऱ्यांचा शिवाराची निवड करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, यासाठी बियाणे व तंत्रज्ञानाचा वापर करताना संभ्रम निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्ह्यात शेतकरी व शेतकरी महिला शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या शेती शाळांसाठी शेतकऱ्यांचा शिवाराची निवड करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.
खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, रासायनिक खते, बियाणे आणि शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे या हेतुने यापूर्वीदेखिल कृषी विभागाने योजना तयार केल्या होत्या. परंतु, काही अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे योजना कागदावरच राहिल्या. याचा अनिष्ठ परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पिके घेतात. त्यामुळे फारसे उत्पादन हाती येत नाही. ऐन हंगामाच्या कालावधीत योग्य मार्गदर्शनाअभावी चुकीचे बियाणे वापरले जाते, याचा फटका शेतकºयांना बसतो.
गेल्यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस पिकाबाबत हा प्रकार घडला. भद्रावती, वरोरा, राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला. या हंगामात जिल्ह्यातील काही निवडक शेतकºयांच्या शेती शिवारात शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेला अधिकाधिक महिला शेतकरी उपस्थित राहतील, यादृष्टीने कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रत्येक शेती शाळेसाठी १४ हजारांची तरतूद
जिल्ह्यातील शेती शाळेसाठी शासनाने १४ हजार रूपयांची तरतूद केली आहे. कृषी सहाय्यकांकडून क्रापसॅफद्वारे निवडलेल्या गावांमध्ये प्रत्यक्षात शिवारात ही शेतीशाळा होईल. कार्यशाळा पार पडल्यानंतर संबंधित अहवाल नोंदणी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेची जबाबदारी आत्मावर सोपविण्यात आली आहे.