पहाडीवरील शेतकरी वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:04 AM2017-08-09T00:04:17+5:302017-08-09T00:05:54+5:30
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जिवती येथील कृषी विभागाच्या बेजबाबदार अधिकाºयांअभावी पहाडावरील शेतकरी अडचणीत आले आहेत.
शंकर चव्हाण/संघरक्षित तावाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जिवती येथील कृषी विभागाच्या बेजबाबदार अधिकाºयांअभावी पहाडावरील शेतकरी अडचणीत आले आहेत. ऐन हंगामातच या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी बुट्या मारत असल्याचे चित्र ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.
पेरणीपूर्व व पेरणीनंतर शेतकºयांना खरिप हंगामातील पिकासंदर्भात योग्य माहिती मिळावी, जेणेकरून शेतकºयांना कमी खर्चात अधिक उत्पन्न घेता येईल, यासाठी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी कृषी कार्यालयाची निर्मीती करून गावोगावी कृषी सहाय्यकाची नियुक्ती केली आहे. मात्र हेच अधिकारी व कर्मचारी कामचुकारपणा करित असल्याचा प्रकार मंगळवारी ११.३५ वाजता स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणला.
या कार्यलयात कार्यरत १७ अधिकारी व कर्मचाºयांपैकी कार्यालयात केवळ १ मंडळ अधिकारी व तीन कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. मागील आठवड्यात शासनाने पीक विमा योजनेबाबत जनजागृती करीत या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. परंतु जिवती तालुक्यात कृषी विभागाच्या नियोजन शून्यकारभारामुळे पहाडावरील अनेक शेतकरी शासनाच्या पीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत.
सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जात असताना येथील कृषी कार्यालयामध्ये अजुनही बायोमॅट्रिक यंत्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे आजही अधिकारी व कर्मचारी रजिस्टरवरच हस्ताक्षरद्वारे हजेरी लावत असल्याचे दिसून आले. शिवाय कार्यालयात व परिसरात स्वच्छतेची ऐसीतैसी झाल्याचे आढळून आले.
कामाची गुणवत्ता ढासळली
सिंचनाची सोय व्हावी व जमिनीत पाण्याची पातळी वाढावी, यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात मातीबांध, ढाळाचे बांध, तुटफुट झालेल्या बंधाºयाची दुरूस्ती तसेच नाला खोलीकरण व बंधाºयातील गाळ काढणे इत्यादी कामे पारदर्शकपणे केल्याचे कृषी विभाग सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात कामाची पाहणी केल्यास भ्रष्टाचाराचे मोठे गौडबंगाल समोर येणार आहे.
फुलोºयात आलेली पिकेही धोक्यात
मागील २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकºयांवर संकट कोसळले आहे. पिकाची वाढ समाधानकारक झाली असली तरी ऊन्हाच्या तिव्रतेने फुलोºयात आलेली पिके धोक्यात आल्याचे दिसत आहे. मात्र कृषी विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मात्र पहाडावरील शेतकºयांत नाराजी पसरली आहे.
सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू असल्याने मार्ग बदलून कार्यालयात आलो. त्यामुळे यायला उशिर झाला.
- इनायत शेख, तालुका कृषी अधिकारी, जिवती.