आधारभूत धान्य खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:00 AM2020-12-15T07:00:00+5:302020-12-15T07:00:19+5:30

Chandrapur News agriculture शेतकरी स्वत:चे धान विक्रीसाठी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर नेण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

Farmers' inclination towards basic grain procurement centers | आधारभूत धान्य खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल

आधारभूत धान्य खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल

Next
ठळक मुद्देखासगी व्यापाऱ्यांंकडून भाव नाहीआधारभूत किंमतच अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क 

 चंद्रपूर : केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमतीवर धान्य खरेदीसाठी १८६३ रुपये हमीभाव जाहीर केला असल्याने तसेच राज्य सरकारने ७०० रुपये बोनस जाहीर केल्याने शेतकऱ्यांना एकूण दोन हजार ५६३ रुपये भाव शासनदरबारी मिळतो. खासगी व्यापाऱ्यांकडे तेवढा भाव मिळत नसल्याने शेतकरी स्वत:चे धान विक्रीसाठी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर नेण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमधून टोकण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून सातबारा देऊन टोकण घेऊन नंबर लावावा लागतो. मात्र ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनागोंदी कारभारामुळे तसेच ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना रोजी-रोटी, तसेच दैनंदिन कामे बाजूला सारून दररोज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चकरा माराव्या लागत आहेत. शेतकऱ्यांना पिकवलेले धान विकण्यासाठी व बाजार समितीमधून टोकण घेण्यासाठी चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.

शेतकऱ्यांचे सातबारे गहाळ

१७ नोव्हेंबरपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत सातबारा जमा करूनही आजतागायत बहुतांश शेतकऱ्यांना टोकण न मिळाल्याने तसेच काही शेतकऱ्यांचे सातबारे गहाळ झाले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा गलथानपणा उघड होत आहे.

अनेक ठिकाणी केंद्र सुरू

ब्रम्हपुरी तालुक्यातील ब्रम्हपुरी, अऱ्हेर-नवरगाव, पिंपळगाव(भो), चौगान, बरडकिन्ही, आवळगाव आदी ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आणि सदर केंद्रांना जवळपासची गावे जोडण्यात आली असून त्या ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नेऊन आपले धान विकायचे आहेत. मात्र त्याआधी संबंधित शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत सातबारा जमा करून टोकण घ्यावी लागते. टोकण मिळाल्यानंतर दिलेल्या दिवशी आपल्या धानाचा काटा करायचा असतो.

Web Title: Farmers' inclination towards basic grain procurement centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती