शेतकऱ्यांचा उत्पन्न-उत्पादन खर्चाचा मेळ बसेना

By admin | Published: November 13, 2016 12:40 AM2016-11-13T00:40:09+5:302016-11-13T00:40:09+5:30

दिवाळीच्या तोंडावर काही भागातील शेतकऱ्यांनी कापूस वेचनीला सुरूवात केली.

Farmers' income-generation expenses do not match | शेतकऱ्यांचा उत्पन्न-उत्पादन खर्चाचा मेळ बसेना

शेतकऱ्यांचा उत्पन्न-उत्पादन खर्चाचा मेळ बसेना

Next

कापूस उत्पादकांची व्यथा
कापसाला हवा किमान सात हजार भाव
राजकुमार चुनारकर चिमूर
दिवाळीच्या तोंडावर काही भागातील शेतकऱ्यांनी कापूस वेचनीला सुरूवात केली. कारण कापूस विकून दिवाळी साजरी करण्याच्या आशेने ग्रामीण भागात कापूस वेचाईला वेग आला होता. किलोभर कापूस वेचण्यासाठी मजुराला ४ ते ५ रुपये दर मजुरांना द्यावा लागत आहे. एक क्विंटल कापूस वेचण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल पाचशे रुपये खर्च होत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्न आणि उत्पादनाचा खर्च याचा मेळ बसविणे कठीण झाले आहे.
दिवाळी साजरी करण्यासह मुलीच्या पहिल्या दिवाळीचे माहेरपण जपण्यासाठी शेतकऱ्यांना कापूस निघाच्या अगोदर काही सामान बाजारातून उधारीवर घेवून दिवाळी साजरी केली. पण आता दुकानदाराचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना घरातील कापूस बेभाव विकण्याशिवाय पर्याय नाही. खासगी व्यापाऱ्यांना अल्प दराने कापूस विकून व्यापाऱ्यांची उधारी द्यावी लागत आहे.
सध्या बाजारात कापसाला प्रति क्विंटल ४५०० ते ४६०० रुपये भाव मिळत आहे. त्यातच पाच रुपये किलोप्रमाणे वेचणी आणि तत्पुर्वी झालेला खत, फवारणी, आणि लागवडीसाठी लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. चार वर्षाच्या सततच्या दुष्काळानंतर यंदा पावसाने संततधार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. खरीपाने भरघोष उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पैशाची जुळवा- जुळव करून पिकांची लागवड केली. सोयाबिनने घात केला असला तरी शेतकऱ्यांच्या आशा पांढऱ्या सोन्याकडे लागल्या होत्या. यंदा अस्मानी संकटाने काहीसे तारले असले तरी सुल्तानी कारभाराने शेतकऱ्यांत नाराजी आहे. मात्र दराचा विचार करता कपाशीचे पीक मारक ठरले आहे. लागवडीचा खर्च अधिक असल्याने कापसाला प्रति क्विंटल ७ हजार रुपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेती मशागतीपासून लागवड बियाणे, फवारणीचा खर्च जवळपास एकरी १८ हजारांवर पोहोचतो. कापूस वेचनीचाही दर प्रति किलो चार ते पाच रुपये आहे. त्यामुळे कापसाला सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाणे आवश्यक आहे.
- बबलू पाटील थुटे
शेतकरी, बोथली

Web Title: Farmers' income-generation expenses do not match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.