रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:20+5:302021-06-28T04:20:20+5:30
सावली : सावली तालुक्यातील उसेगाव येथे शेतात पऱ्हाटीची फवारणी करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. ...
सावली : सावली तालुक्यातील उसेगाव येथे शेतात पऱ्हाटीची फवारणी करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. रमेश मेश्राम असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला पुढील उपचाराकरिता गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
रमेश मेश्राम हे इंद्रजीत मेश्राम यांच्या नदीकाठी असलेल्या शेतात फवारणीकरिता गेले होते. लपून बसलेल्या रानडुकराने रमेशवर हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमी शेतकऱ्यास सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. पुढील तपास सावली वनविभाग करीत असून, आर्थिक मदतीची मागणी होत आहे. सध्याच्या परिस्थितीत रानडुकरांच्या वाढत्या संख्येने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात लावलेले पीक नष्ट करणे, शेतकऱ्यांवर हल्ला करणे, अशा अनेक प्रकारचे नुकसान रानडुकरामुळे होत असून, शासनाने याचा त्वरित बंदोबस्त करावा, अथवा मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
===Photopath===
270621\img-20210627-wa0165.jpg
===Caption===
रानडुकराच्या हल्ल्यातील जखमी ईसम