अतिपावसाने कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:16+5:302021-09-08T04:34:16+5:30
कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. कापूस पिकावर फूल गळणे, बोंड सडणे, बुरशी ...
कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. कापूस पिकावर फूल गळणे, बोंड सडणे, बुरशी चढणे, मुळे ढिले पडणे, रोगराई, सोयाबीन पिकावर फूल गळणे, शेंगाची झोंब कमी होणे, दाण्याला डाग, तुरीवर बुरशी चढणे, ज्वारी काळी पडणे आदी विकार जडत आहे. परिणामी आता पाऊस शेतीच्या दृष्टीने नुकसानदायक ठरतो आहे. कोरपना हा कृषिप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. येथील नागरिकांचा उपजीविकेचा व्यवसाय शेती हा मुख्यत्वे आहे. या तालुक्यात कापूस व सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. आधीच शेतकरी विविध संकटांनी ग्रासला असताना निसर्गही त्याची परीक्षा पाहत आहे. त्यामुळे कोरपना तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.