रात्री पिकाला पाणी देणे शेतकऱ्याच्या जिवावर बेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:51 PM2018-11-02T22:51:12+5:302018-11-02T22:51:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : तालुक्यातील महालगाव येथील एका शेतकऱ्याचा रात्री पिकांना पाणी देत असताना करंट लागून मृत्यू झाला. ...

At the farmer's life, giving water to the crop at night, | रात्री पिकाला पाणी देणे शेतकऱ्याच्या जिवावर बेतले

रात्री पिकाला पाणी देणे शेतकऱ्याच्या जिवावर बेतले

Next
ठळक मुद्देविद्युत धक्क्याने मृत्यू : महावितरणचा कारभार दोषी असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : तालुक्यातील महालगाव येथील एका शेतकऱ्याचा रात्री पिकांना पाणी देत असताना करंट लागून मृत्यू झाला. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळेच तरुण शेतकऱ्याचा बळी गेल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला असून दोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी मृतदेह वरोरा येथील महावितरणच्या कार्यालयाच्या दालनात ठेवला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
वसंता नामदेव जांभुळे (३४) रा.महालगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वसंता जांभुळे हा गुरुवारी रात्री २ वाजताच्या सुमारास गावापासून दोन किलोमीटरवर असलेल्या आपल्या शेतामध्ये मोटारपंपद्वारे पिकांना पाणी देण्यासाठी गेला असता विजेचा धक्का बसला. उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वरोरा येथील महावितरण कार्यालयाच्या दालनात शेतकºयाचा मृतदेह ठेवल्याने तणाव निर्माण झाला. सदर शेतकºयाचा मृत्यू हा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे झाला असल्याचा आरोप मृत शेतकऱ्याच्या वडिलांनी केला. यावेळी उपसभापती राजू चिकटे व शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश भालेराव, मनोज दानव, नगरसेवक पंकज नाशिककर, सन्नी गुप्ता, दिनेश यादव आदी उपस्थित होते.
आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे
मुख्य कार्यकारी अभियंता हे पोलीस बंदोबस्तात महावितरण कार्यालयात आले असता उपस्थित शेतकºयांनी त्यांच्या विरोधात नारेबाजी करीत आपला संतात व्यक्त केला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी मान्य केली असून अंतविधीसाठी २० हजार रुपयांचा धनादेश मृतकाच्या कुटुंबीयांना दिला आहे. तसेच सदर घटनेचा तपास केल्यानंतर आलेल्या अहवालानुसार उर्वरित चार लाख रुपयांची मदत केली जाईल, असे अभियंता प्रशांत राठी यांनी सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शासकीय आदेशाला केराची टोपली
मागील काही दिवसांपासून भारनियमन बंद करण्यासाठी विविध पक्षाने आंदोलन केली. त्यानंतर अध्यक्ष तथा वयवस्थापकीय संचालक महावितरण यांनी परिपत्रक काढून १ नोव्हेंबरपासून दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र वरोºयात तसे करण्यात आले नाही.

Web Title: At the farmer's life, giving water to the crop at night,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.