शेतकऱ्यांनी थाटला धान्य स्वच्छतेचा कारखाना

By Admin | Published: September 17, 2016 01:12 AM2016-09-17T01:12:15+5:302016-09-17T01:12:15+5:30

अलिकडे अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात. असाच एक प्रयोग चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील

The Farmers Plant Factory | शेतकऱ्यांनी थाटला धान्य स्वच्छतेचा कारखाना

शेतकऱ्यांनी थाटला धान्य स्वच्छतेचा कारखाना

googlenewsNext

चंद्रपूर : अलिकडे अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात. असाच एक प्रयोग चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकऱ्यांनी करून ‘आत्मा’च्या मदतीने धान्य स्वच्छता व प्रतवारीचा कारखाना उभा केला आहे. अल्पावधीतच हा कारखाना शेतकऱ्यांना नफा देणारा ठरला आहे. या नाविण्यपूर्ण प्रयोगाने इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
चिमूर तालुक्यातील सावरगाव हे ६ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील शेतकरी प्राधान्याने धान, सोयाबीन, हरभरा, तुर आदी पारंपारिक पिके घेतात. ही पिके विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत नेल्या जात होते. मात्र पाहिजे त्या प्रमाणात त्यांच्या मालास भाव मिळत नव्हता. यावर पर्याय सोधण्यासाठी काही शेतकऱ्यांनी आत्मा कार्यालयाशी संपर्क साधला.
या कार्यालयाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाने गावातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येत सन २०११-१२ मध्ये जय किसान स्वयंसहाय्यता शेतकरी बतच गटाची स्थापना केली व एकत्रितपणे शेत माल पिकवून विकण्याचा प्रयोग केला.
गटाच्या वतीने एकत्रित शेतमाल विकल्या जात असला तरी काढणी पश्चात तंत्रज्ञानाची माहिती नसल्यामुळे त्यांच्या मालास आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमत मिळत होती. सन २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प व आत्माच्या वतीने गटाने धान्य स्वच्छता व प्रतवारी उद्योगाची माहिती व प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सन २०१४-१५ पासून प्रत्यक्षात धान्य स्वच्छता व प्रतवारीचा गावात कारखाना सुरु केला. यासाठी गटास ९० टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले.
आत्मा कार्यालयाच्या वतीने यासाठी मिळालेले प्रोत्साहन व प्रशिक्षणामुळे वेगळा प्रयोग उभारता आला असल्याचे गटातील शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात भविष्यात इतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता व प्रतवारीचे उद्योग निर्माण करण्यासोबतच दालमिल उभारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आत्मा कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कार्यालयाला भेट देण्याचे आवाहन आत्माने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

इतरांनाही करून मिळते धान्य स्वच्छ
स्वच्छता व प्रतवारी सुरुवात झाल्यानंतर गटातील सर्व शेतकऱ्यांचा कृषी माल स्वच्छ होवून बाजारपेठेस जावू लागल्याने इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत या शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळू लागला आहे. धान, सोयाबिन, तुर, हरभरा या मालास सरासरी ३०० ते ४०० रुपये अधिक भाव मिळाला. विशेष म्हणजे, अन्य शेतकऱ्यांच्या कृषी मालासही गटाच्या कारखान्यात ८० रुपये प्रति क्विंटल या दराने धान्य स्वच्छता व प्रतवारी करुन दिली जात असल्याने यातूनही गटास चांगला नफा मिळत आहे. सप्टेंबर २०१५ अखेर इतर शेतकऱ्यांच्या मालाची स्वच्छता व प्रतवारीतून गटास १ लाख रुपयाचे निव्वळ उत्पन्न मिळाले होते.

Web Title: The Farmers Plant Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.