प्रकल्पग्रस्त शेतकरी व बेरोजगारांचा आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:00 AM2019-12-12T06:00:00+5:302019-12-12T06:00:27+5:30
वेकोलिने पोवनी २ व पोवनी ३ कोळसा खाणीसाठी साखरी, पोवनी, वरोडा चिंचोली, हिरापूर येथील शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. परंतु तीन वर्षांचा कालावधी उलटूनही वेकोलिने शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : वेकोलिने कोळसा खाणीसाठी शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहित केल्या. मात्र या जमिनीवर वेकोलिने खोदकाम सुरू केल्यानंतरही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला व नोकरी दिली नाही. तर अनेक ठिकाणी स्थानिकांना डावलून परप्रांतीयांचा भरणा करीत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, तसेच नोकरीतमध्ये सामावून घ्यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे व माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात बुधवारी वेकोलिच्या सब एरिया मॅनेजर कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
वेकोलिने पोवनी २ व पोवनी ३ कोळसा खाणीसाठी साखरी, पोवनी, वरोडा चिंचोली, हिरापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. परंतु तीन वर्षांचा कालावधी उलटूनही वेकोलिने शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला नाही. तसेच नोकरीत सामावून घेतले नाही. उलट शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची शेती गेली. त्याचे उत्पानाचे साधन केले. तसेच अनेकजण वेकोलि नोकरी देईल. या प्रतीक्षेत आहेत. मात्र वेकोलित काम करणाऱ्या जी. एन. आर. कंपनीने स्थानिक बेरोजगारांना डावलून परप्रांतियांना रोजगार दिला. हा शेतकऱ्यांवर वेकोलिने केलेला अन्याय आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वात वेकोलिच्या सब एरिया मॅनेजर कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन पोवनी २ चे सब एरिया मेनेजर सी. पी. सिंह व प्रबंधक एकंभरम यांना दिले. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण करुन असे, आश्वासन वेकोली अधिकाºयांनी दिले.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, बंटी मालेकर, सोनू ठाकूर, भुमन सल्लम यांच्यासह साखरी, पोवनी, वरोडा, चिंचोली, हिरापूर, गोवरी परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी बेरोजगार युवक उपस्थित होते.