वनसडीच्या बँकेत शेतकऱ्यांची रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:05 PM2019-03-15T22:05:56+5:302019-03-15T22:06:16+5:30

औद्योगिक व शेतीप्रधान तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वनसडी येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथील इंटरनेट लिंक तांत्रिक कारणासाठी शुक्रवारी दिवसभर बंद असल्याने शेतकरी ग्राहकांना कामधंदे सोडून ताटकळत रहावे लागले. बँक बंद होण्याची वेळ झाली असतानाही लिंक सुरू न झाल्याने आल्या पावली ग्राहकांना रिकाम्या हाताने घरी जावे लागले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Farmers' Rings at Wansadi Bank | वनसडीच्या बँकेत शेतकऱ्यांची रीघ

वनसडीच्या बँकेत शेतकऱ्यांची रीघ

Next
ठळक मुद्देग्राहक रिकाम्या हाताने परतले : दिवसभर लिंक नसल्याने कामकाज ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : औद्योगिक व शेतीप्रधान तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वनसडी येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथील इंटरनेट लिंक तांत्रिक कारणासाठी शुक्रवारी दिवसभर बंद असल्याने शेतकरी ग्राहकांना कामधंदे सोडून ताटकळत रहावे लागले. बँक बंद होण्याची वेळ झाली असतानाही लिंक सुरू न झाल्याने आल्या पावली ग्राहकांना रिकाम्या हाताने घरी जावे लागले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
इंटरनेट लिंकवर सर्व बँकिंग व्यवहार अवलंबून आहे. संपूर्ण आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार लिंक नसल्याने ठप्प पडत आहे. दि. १५ ला सकाळी १०.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मोठ्या संख्येने ग्राहक या बँकेत पैसे काढण्यासाठी तसेच इतर कामांसाठी आले होते. मात्र दिवसभर वाट पाहूनही काहीेच फायदा झाला नाही. इंटरनेट लिंक संबंधात अनेकवेळा असाच प्रकार येथे घडत असल्याने ग्राहक या बँकेच्या व्यवहाराला त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे, बँकेतील एटीएमसेवाही बंद असल्याने पैसा काढायचे कुठून असा प्रश्न येथील ग्राहकांना पडला. या बँकेच एकच कॅश काऊंटर असल्याने अन्य दिवशीही ग्राहकांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. एकमेव बँक असल्याने ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र त्या तुलनेत येथे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास बँक व्यवस्थापन कमी पडले आहे. यासंदर्भात ग्राहकांनी अनेकवेळा तक्रारही केल्या आहेत. मात्र उपयोग झाला नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे असून येथे कर्मचाऱ्यांचीही संख्या कमी आहे. त्यामुळे इतर दिवशीही ग्राहकांना कामाशिवाय वापस जावे लागते. त्यामुळे ग्राहक सकाळपासून या बँके परिसरात रांगेत उभे राहून आपला नंबर लावतात.
गरिबांना फटका
वनसाडी बँक आॅफ इंडिया कार्यक्षेत्रात अनेक अतिदुर्गम व आदिवासीबहुल गावे आहे. तेथील नागरिकांना ही एकमेव जवळची बँक आहे. परंतु येथे कामे लवकर होत नसल्याने त्याचा फटका गरीब शेतकºयांना बसत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लग्नकार्य तसेच इतर कामासाठी पैसे काढण्यासाठी ग्राहक येतात मात्र त्यांना निराश व्हावे लागत आहे.

Web Title: Farmers' Rings at Wansadi Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.