पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:34 AM2019-06-08T00:34:20+5:302019-06-08T00:34:57+5:30
जिल्ह्यातील धानपीक घेणाºया शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेषत: नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, सावली, गोंडपिपरी, बल्लारपूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून नानाविध प्रजातीच्या भातपिकाचे उत्पादन घेतल्या जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील धानपीक घेणाºया शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. विशेषत: नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, सावली, गोंडपिपरी, बल्लारपूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून नानाविध प्रजातीच्या भातपिकाचे उत्पादन घेतल्या जाते. शेतकरी हंगामाची तयारी करून आता पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे.
सरासरी जून महिना लागल्यानंतर भातपीक उत्पादनासाठी लागणाºया शेतीच्या कामाला सुरूवात होते. परंतु आता मोठा पाऊस पडणे गरजेचे आहे. जून महिना लागून एक आठवडा सपंत आला. मृग नक्षत्र आजपासून सुरूवात झाला. पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
हवामान खात्याने १८ जूनपर्यत मान्सून येईल, असा अंदाज वर्तविला आहे. पण शेतकरी पाऊस केव्हा पडेल आणि आपल्या शेताच्या कामाला सुरूवात होईल, याची प्रतीक्षा करीत आहेत. जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नसल्याने शेतकरी आपल्या परंपरागत शेती व्यवसायाकडे गांभिर्याने बघत आहेत. यंदा पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. हा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.
शेतीमध्ये नफा होवो की तोटा पण, याशिवाय अन्य व्यवसाय करणे कठीण आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायात नेहमी तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच यंदा केंद्र सरकारने खताचे भाव वाढविले. परंतु, नव्या उमेदीने शेतकरी पैशाची जमवाजमव करून शेती करण्यास सज्ज झाले आहेत. त्याच उमेदीने यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी सोयाबीन व कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली.
जून महिना लागून एक आठवडा झाला. पण पाऊस परिसरात झाला नाही. मान्सूनचा पाऊस पडला तर शेतकºयांनी शेतातील जमीन नांगरणी, पाळी भरणे या कामाला सुरूवात केली. पाऊस न झाल्याने ही शेतकºयांची लागवडपूर्वीची कामेही खोळंबली आहेत. मागील वर्षी अल्प उत्पन्न झाल्याने शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला. पीक कर्ज न मिळाल्याने पैशाची जुळवाजुळवा करण्यास हतबल झाला. तर दुसरीकडे पाऊस येणार की नाही, या चिंतेने त्याचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. शेतातील बरीच खोळंबल्यामुळे त्याचा हंगामावर परिणाम होण्याचा धोका शेतकरी व्यक्त करीत आहेत.