पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:27 AM2021-05-14T04:27:45+5:302021-05-14T04:27:45+5:30
चंद्रपूर: सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यातच शेतीहंगाम जवळ येत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पीक ...
चंद्रपूर: सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यातच शेतीहंगाम जवळ येत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पीक कर्जाची रक्कम बँकेत जमा करून आता नवीन कर्ज घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र यासाठी शेतीचा सातबारा तसेच अन्य कागदपत्र लागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सध्या कोरोनाची दहशत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या कामामध्ये लागली आहे. दरम्यान, काही तलाठी त्यांच्याकडे असलेल्या गावात जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा तसेच अन्य कागदपत्र घेण्यासाठी मुख्यालयी जावे लागत आहे. मात्र तिथेही ते भेटतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होत आहे.
सध्या लॉकडाऊन असल्याने पाहिजे तशा वाहनांच्या सुविधाही नाही. त्यातच कोरोना संकट असल्यामुळे मुख्यालयी येणेही धोक्याचे ठरत आहे.
वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन तलाठ्यांना गावातच पाठवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.