शेतकऱ्यांनी श्री पद्धतीचा अवलंब करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 11:11 PM2018-05-23T23:11:35+5:302018-05-23T23:11:35+5:30
शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच धान पिकाची लागवड करताना ‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड करून एक रोपटे २५ ते ३० सेंटीमीटर अंतरावर धानाचा रोपे लावावे, त्यामुळे उत्पन्नात वाढ होत असते, असे प्रतिपादन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा विभागाच्या प्रकल्प संचालिका विद्या मानकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवाडा बुज : शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
तसेच धान पिकाची लागवड करताना ‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड करून एक रोपटे २५ ते ३० सेंटीमीटर अंतरावर धानाचा रोपे लावावे, त्यामुळे उत्पन्नात वाढ होत असते, असे प्रतिपादन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा विभागाच्या प्रकल्प संचालिका विद्या मानकर यांनी केले.
पोंभुर्णा तालुका अंतर्गत येत असलेल्या भीमनी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तथा तालुका कृषी अधिकारी पोंभुर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेतंर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोंभुर्णा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुशीकांत गाडेवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषीसहाय्यक संतोष कोसरे, हिराचंद परशुराम कोहपरे, कृषीतंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे बी.टी. एम. एन. डी पेंदाम, प्रफुल पाथरे, कृषीमित्र निखील तिमांडे, सुभाष काळे, भाऊजी कोहपरे आदी उपस्थित होते.
शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व भात पिकावरील तुडतुडे किडीचे व्यवस्थापनावरील सनियंत्रण याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आत्माच्या प्रकल्प संचालिका विद्या मानकर म्हणाल्या कापूस हंगामात चोर बिटी बियाणाची खरेदी करु नये, धानपिकावर तुडतुडा नावाच्या रोगाचा प्रादूर्भाव आहे. शेतकºयांनी कीटकनाशक फवारणी काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे रब्बी हंगामात घेण्यात येणाºया पिकांसाठी उच्च प्रतीच्या बियाण्याची लागवड करावी, त्यातून योग्य उत्पादन होण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले.
तर कृषी अधिकारी सुशीकांत गाडेवार यांनी शेतकरी प्रशिक्षणाच्या दृष्टीकोनातून अनुसुचित जाती जमाती शेतकºयांच्या हितासाठी कृषी विषयक योजनेची माहिती देऊन या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन नियंत्रणातंर्गत धान पिकावरील तुडतुडे नावाच्या रोगाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.
शेतकरी प्रशिक्षणात अनेक शेतकºयांनी सहभाग नोंदविला होता. संचालन संतोष कोसरे यांनी केले तर आभार एन.डी. पेंदाम यांनी मानले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.