शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:48 PM2018-07-09T23:48:31+5:302018-07-09T23:48:48+5:30

कृषी उत्पन्न समितीद्वारे आयोजित ‘शेतकरी उपहार योजना’ हा स्तुत्य कार्यक्रम असून याद्वारे शेतकºयांंना प्रोत्साहीत करण्यात येत आहे. आजच्या आधुनिक काळात उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शेतकºयांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

Farmers should know new technology | शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करावे

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करावे

Next
ठळक मुद्देदीपक केसरकर : भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : कृषी उत्पन्न समितीद्वारे आयोजित ‘शेतकरी उपहार योजना’ हा स्तुत्य कार्यक्रम असून याद्वारे शेतकºयांंना प्रोत्साहीत करण्यात येत आहे. आजच्या आधुनिक काळात उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शेतकºयांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीच्या वतीने भाग्यशाली शेतकरी उपहार योजना सोडत शेतकरी मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मुर्लीधर गुंडावार सभागृहात रविवारी पार पडले. याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीचे मुख्य मार्केट व उपबाजार आवारात शेतमाल व कापूस विक्री करणाºया शेतकºयांसाठी भाग्यशाली शेतकरी उपहार योजना राबविण्यात आली.
मेळाव्याचे उद्घाटक म्हणून गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, अध्यक्षस्थानी आ. बाळू धानोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आर्णीचे माजी आ. श्रीकांत मुनगीनवार, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा बँकेचे संचालक रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा धानोरकर, बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे, सतिश भिवगडे, प्रवीण बांदूरकर, राजु चिकटे, सिक्की यादव, सुनील संकुलवार, सागर हरियाणी, स्वप्नील पाटील, विशाल बदखल, विजया रोगे, प्रफुल्ल चटकी, सचिन भोयर, अशोक हरियाणी, सुधीर मुडेवार व बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.
या कार्यक्रमात भद्रावती तालुक्यातील कृषी व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल २३ शेतकºयांचा कृषी मित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच ५ उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील सर्व सरपंच तसेच सहाकरी सेवा संस्थांच्या अध्यक्षांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समित वरोरा अंतर्गत शेतकºयांना आस्कमित मदत म्हणून धनोदश देण्यात आले. चिमुकल्यांच्या हस्ते भाग्यशाली शेतकरी उपहार योजना सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यात ५५ बक्षिसे देण्यात आली. प्रथम गजानन गुरनुले, व्दितीय अमोल कष्टी, तृतीय महादेव ठेंगणे, चर्तुथ बक्षिस रामदास गिरसावळे राकेश चौधरी या दोन शेतकºयांना देण्यात आले. संचालन प्रा. सचिन सरपटवार यांनी केले. प्रास्ताविक ठाकरे, आभार जिवतोडे यांनी मानले.

Web Title: Farmers should know new technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.